'अ‍ॅबनॉर्मल पाखरू'

बेफिकीर - ⏱ १ मिनिट

मध्यरात्री गाठते भलतेच बादल पाखरू
बिननियंत्रण फडफडे हे 'अ‍ॅबनॉर्मल' पाखरू

लावते कुंकू कुणाचे हे कुणी पाहू नये
पोचते भलत्याकडे घालून 'काजल' पाखरू

एक मंगळसूत्र जातो घालण्या त्याच्या गळ्या
बांधुनी घेते दुजाकडुनीच 'पायल' पाखरू

काय त्या गौरांगनांना लागले सोने असे?
आमच्या दुनियेत झाले 'हिट्ट' श्यामल पाखरू

'बेफिकिर' माझी उपेक्षा तूच बस समजून घे
लाभुदे माझ्या नशीबी एक 'नॉर्मल' पाखरू

गझल