आजारास कारण की...

==============
प्रिये, तू अशी  साजरी  राहते,
न तब्बेत  माझी  बरी  राहते...


असा  'ताप'तो  मी  तुझ्या  संगती,
तव्याशी  जशी  भाकरी  राहते


कळाले मला  'बीपी ' का  वाढतो,
तुझी  ओढ जी  अंतरी  राहते


स्मृतीभ्रंश  होतो तुला  पाहुनी,
तुझे  नाव  मेंदूवरी  राहते


का  'अर्धांगवायू'  न व्हावा  मला?
'अर्धांगिनी'  ना  घरी  राहते !


'मधुमेह'  होतो,  कळाले  कसा?
मनाशी   तुझी  माधुरी  राहते..


असे  व्याधीचे  रूप घेवुनीया,
शरीरात  माझी  'परी'  राहते...!


==============

Taxonomy upgrade extras