जे आपले त्यांनीच हो दारात लाजच काढली
ती काय झाली चूक, ह्या नादात रात्रच काढली
माझी कशी ती योग्य मापे आज त्यांनी काढली
जी मारली चप्पल मला, पायात छानच मावली
थोबाड माझे एव्हढे का आवडे त्यांना मुळी ?
की डांबराने, द्रूष्ट ती लाडात आजच काढली
गाली खळी ती पीकदाणी, पानदानच वाटली
तोंडावरी नक्षी कशी थाटात छानच काढली
तो पूर्वजच का आठवे बघताच माझे थोबडे
'ए मर्कटा' 'मूर्खा' अशी कानात हाकच मारली
सौंदर्य माझे देखता ते दोन पाय शिवशिवले
प्रेमात माझ्या प्रूष्ठभागी लाथ छानच मारली
त्या नग्न जीभेला किती ती धार त्यांनी लावली
ऊध्दार सा-यांचा करत बारात छानच काढली
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा