===================
हे तुझे माझ्यावरी रागावणे नाही बरे,
दूर माझ्यापासुनी ते धावणे नाही बरे..
मी तुझ्यासाठी फुलांची माळ आहे गुंफली
दागिन्यांची रास तुजला भावणे नाही बरे..
रोज "माझे प्रेम आहे," हे किती समजावतो?
रोजचे माझे असे समजावणे नाही बरे..
मी कधी रात्रीस आलो एकटा दारी तुझ्या,
श्वान माझ्या पावलाला चावणे नाही बरे..
हाय! मी देणार होतो मोकळे आकाश हे...
तू दुज्याच्या फ्लॅटमध्ये मावणे नाही बरे !
=====================
(हझल असावी अशी शंका आहे.)
Taxonomy upgrade extras
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा