तिलकधारी, गप्प हो! हझल

सावजे येथे अशी की खुद शिकारी गप्प हो
गझलवन निर्बीडसे हे तिलकधारी गप्प हो


खूप श्रीमंतीत सारे, कोण मागे कर्ज रे?
हो दिवाळे, बंद कर ती सावकारी गप्प हो


दोष वृत्ताचा असो पण दोष वृत्तीचा नसो
सोड आता शायरांची वाटमारी, गप्प हो


गझलियत पाहून घेऊ आमची आम्हीच रे
तू नको शिकवूस आम्हा शिस्त सारी, गप्प हो


जीभ चाले वाकडी ज्या शायरांवर, ते तुझी
फेडण्या आलेत सारी उसनवारी, गप्प हो


हे असेही करु नये नी ते तसेही करु नये
बास झाली मसलतीची ही तुतारी, गप्प हो!


खेळकर आहेस तुज रागावणे ना शोभते
लागला का वार माझा रे जिव्हारी? गप्प हो!




 

Taxonomy upgrade extras