
एवढे रंगू नये स्वप्नात कोणी
फारसे गुंतू नये कोणात कोणी
काय होता आपला संबंध आधी ?
निर्मिले नाते तुझ्यामाझ्यात कोणी ?
हेलकावे रोज या प्राणास बसती
सांग, भरली वादळे श्वासात कोणी ?
दिवस हे कोणामुळे बहरून गेले ?
आणि स्वप्नांनी सजवली रात कोणी ?
खेळ प्रीतीचा सुरू झाला मनोहर
सांग, केली नेमकी सुरुवात कोणी ?
-- केदार पाटणकर
Taxonomy upgrade extras
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा