किती आळशी तू किती आळशी
दही भाकरी रोज का वाढशी?
जरी चूक नाही तरी धुंडते
पकडतेच मज ती जशी सांडशी
जरी दूध द्यावे तिला साय ही
गिळे मूषकाला मनी-मावशी
वयाचा म्हणे ती तुला पोच ना
स्वतः नाचते पण जणू षोडशी
सदा दागिन्यांचा धरे हट्ट ती
सणाला म्हणे खा शिळी लापशी
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा