काम उरकले दुपार झाली काय बरे करुया आता?
वडीलकीच्या नात्याने बडबडगीते रचुया आता
सरपटणारा काऊ पाहुन माकड झटके पंखांना
उंदिर पाहुन माऊ बिचके काहीही म्हणुया आता
महिलामंडळ घुसले आहे खोचुन पदराला येथे
गझल राहिली बाजूला मारामारी बघुया आता
रस्ता ओलांडाया केले सहाय्य कोणी अंधाला
अंध म्हणे चल तुलाहि नेतो हसुया की रडुया आता?
लहान बाळे स्वप्नामध्ये मल्लीकाशी खेळ करी
पालक चोखी अंगठ्यास रे इथे कसे जगुया आता?
नवीन रंगाने रंगवला शेर नवा, अन आले वर
भांडवलाची कमतरता नूतनीकरण करुया आता
धन्यवाद सर्वांना देणे महिन्याने का सुचते रे?
इतरांना आठवून अपले स्मरण त्यांस करुया आता?
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा