टिळा (हझल)

ठोकला भिंतीत मी मोठा खिळा...
लावली माझी छबी, अन् वर टिळा!

राम या जागी पुन्हा येईल का?
माणसे झाली बघा येथे शिळा...

यंत्र पैसे देत जाऊ लागले!
मी म्हणालो 'उघड दरवाजा तिळा'...

भोपळा मी होत जातो नेहमी
आणि सुखही नेहमी होते विळा!

काम त्यांनाही कधी नसतेच का?
गात बसती सारख्या या कोकिळा

- कुमार जावडेकर, मुंबई

Taxonomy upgrade extras