पळवाट
कौतुकाचा पाट शोधू
जरा काही भाट शोधू
रात्र थोडी सोंगे फार
त्या करता पहाट शोधू
गाडग्याने काय होइल?
त्याला छान रहाट शोधू
गंगेचेच स्वप्न धरुनी
मिसिसिपीचा घाट शोधू
ये भरती अमावस्येला
अशी वेगळी लाट शोधू
ठकाला मिळतो महाठक
असा दिल्लीहाट शोधू
Taxonomy upgrade extras
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा