मला माहीत आहे गाल त्यांचा यार आहे
तरी केसांस घे मागे इथे अंधार आहे
अरे वा! हे कवी आधी कसे नाहीत दिसले?
विकावे काव्य येथे चोरटा बाजार आहे
मनाला पाहता ती बोलली मुरडून नाके
"म्हणे नक्कोच! मोठा फार हा आकार आहे"
पुढे केले जरा ओठांस मी, ती लांब झाली
नको मोडू व्रताला ती म्हणे गुरुवार आहे
"चला नशिबास काढू,या इथे मंदीर काढू"
पुजारी बोलतो पत्नीस, "बेडा पार आहे"
कुणाला लाज नाही सांगण्याची खाज ज्याला
बिचारा वेळवेळी खात गेला मार आहे
विनय का सोडलाहे मोगर्याने जाणले मी
तया देठास कोणाचातरी आधार आहे
Taxonomy upgrade extras
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा