गझल

गझल

तुला पाहतो...

तुला पाहतो...जणू पाहतो आरसाच मी!
किती किती भासतो स्वतःला वेगळाच मी!

अजून मजला साद घालती चुकार लाटा..
अजून आहे किनार्‍यावरी कोरडाच मी!

बदल तुझ्या नजरेतच बहुधा आहे झाला
नाहीतर हा तसाच आहे कालचाच मी!

जणू हरवलो सागरामध्ये गहिरनिळ्या..
फक्त तुझ्या डोळ्यांत पाहिले एकदाच मी!

चांदणराती क्षणभर येते याद तुझी, मग

विरह

झाला विरह अता मी, रडणार फक्त आहे
अश्रू मुळीच नाही, ढळणार रक्त आहे

बाहेर येउनी ना, दुःखास दर्शवावे
अश्रूंस पापण्यांची, ताकीद सक्त आहे

जाणीव पातकाची ,घडवी बदल असा की
सैतान कालचा तो , आता विरक्त आहे

आशेवरी जगावे, हे फक्त आठवावे
येणार जो उद्या तो, माझाच वक्त आहे

देउ कशी

आयुष्य

जुनीच गणिते पुन्हा नव्याने मांडत आहे
आयुष्याची गृहीतके पडताळत आहे

जगण्याचा कोणी शिकवावा अर्थ... कुणाला?
मीही केवळ माझ्यापुरता लावत आहे

आयुष्याचा वेग विलक्षण आहे; पण मी -
अखेर त्याला अर्ध्यावरती गाठत आहे

कोण शक्यता पेरत गेले उरात माझ्या?
'चल किरणांशी खेळू'... कोंभ खुणावत आहे!

जेथे होतो तिथेच आहे... वरवर बघता

उत्तर

पुरे तुझा हा रडवेला स्वर;
चल जगण्याशी दोन हात कर!

तुझे नि माझे जमणे नाही....
जा बाई तू मला माफ कर...!

दुर्गंधी लपणार कोठवर?
जरी लावले उंची अत्तर !

मीही मित्रा ध्यास घेतला....
कितीक करशील माझा वापर?

रानफुले शिकतात उन्हातच...
कुठली शाळा? कुठले दप्तर?

आता असतील प्रश्नही माझे
हवे तसे

वेळिअवेळी

एक सांगु का? बरे नव्हे हे असे बहरणे वेळिअवेळी
सांजसावल्या खुणावताना दंवात फिरणे वेळिअवेळी

वेळिअवेळी झुळुक कोवळी तुझा विचारी ठावठिकाणा,
हिरमुसलेल्या चंद्राचेही तुलाच स्मरणे वेळिअवेळी

रोज भेटलो तरी न घडते भेट कधीही मनासारखी,
आठवून त्या जुन्याच भेटी, उगाच झुरणे वेळिअवेळी

वाट वाकडी करून त्याच्या वाटेवर रोजचे थबकणे,
आसुसलेल्या नजरांचे गालिचे

मारला गेलो

गझल परिचय

वृत्त : वियद् गंगा ( उर्दू : हजज मुसम्मन सालिम )

उर्दू गण मफाइलून मफाइलून मफाइलून मफाइलून

मोडणी लगागागा लगागागा लगागागा लगागागा

लगावली U - - - U - - - U - - - U - - -

मात्रावली १ २ २ २ १ २ २ २

... तुरुंग सारे!

**********************************
**********************************

कळा मनीच्या जुळवत होते भणंग सारे
बिनाजळाच्या अवखळ डोही तरंग सारे

उगाच आता नवी कहाणी पुन्हा कशाला
जुना पुरावा, जुनेच किस्से, प्रसंग सारे

कसे फुलावे कसे मिटावे कुणास सांगा
फुलांत बसले लपुन अनोखे भुजंग सारे

जुने नवे घांव बुजवुनी बेफिकीर झालो
चकवुन गेलेच बुडबुडे अन तवंग सारे

सुरा-सुधेचा

मराठी गझल

(आदरणीय सुरेश भटांच्या जयंतीनिमित्त.....)

मराठी गझलही पुढे येत आहे
मराठीसही ती पुढे नेत आहे

व्यथांनी करावी मशागत मनाची...
अशा आशयाचे तिचे शेत आहे

निराकार निर्गुण अशा वेदनेचा
तिचा शब्द एकेक संकेत आहे

जगाया पुरेशी तिची प्रेरणाही
तिचा श्वास आश्वासने देत आहे

तिच्या लौकिकाचा करी दिव्य हेवा
यशाची कथा ह्या असूयेत

..प्राण नाही

कृष्णवाणीला जराही राहिलेला त्राण नाही...
...राहिलेला अर्जुनाचाही स्वयंभू बाण नाही

बोथटांचे हे प्रशासन चाललेले छानपैकी..
चेहर्‍यावरती कुणाच्या कोणताही ताण नाही

पारितोषिक प्राप्त झाले.. सर्व काही स्वच्छ झाले..
कागदोपत्री जराही गाव आमुचे घाण नाही

नोकरीचे काम आहे...टाक पाटी...घाल पाठी...
जीव ओतायास काही हे सतीचे वाण नाही...!

मत्त आणिक मट्ठ लोकांचीच सत्ता

मात्रा

मनाची अता थांबली काहिली
विषाला विषाचीच मात्रा दिली!

कुठे लोपले कालचे हासणे?
कुठे ती तुझी आज जिंदादिली?

कुणी जाणल्या का नभाच्या व्यथा?
कुणी मातिची यातना पाहिली?

सुखाचा तिथे घोष होईल का?
जिथे वेदनेचीच संथा दिली!

दुभंगून घे माय पोटी अता,
उभा जन्म मी वंचना साहिली