बोलताना तोल गेला...

मानस६ - ⏱ १ मिनिट
बोलताना तोल गेला

बोलताना तोल गेला,
घाव झाला खोल गेला

कालचा उपदेश माझा,
काय मित्रा फोल गेला?

पैंजणांना चेतवाया,
ढोलकीचा बोल गेला

अश्रू सांगे वाहताना,
-"जन्म कवडी-मोल गेला".

नेत्र-बाणा , सांग ना रे,
येव्हढा का खोल गेला?

वाढला अंकुर पण का,
सोडुनी ती ओल गेला?

काय रामाच्या कथेतुन,
जानकीचा रोल गेला?

                -मानस६
गझल