दाखला

जयन्ता५२ - ⏱ १ मिनिट


हा दाखला तो दाखला
"तू जन्मला, तू संपला"

असणे तुझे, नसणे तुझे
दो कागदांचा मामला

करता उद्याचे बेत मी
तो काळ छद्मी हासला!


धावा कधी केला न मी
मग तो मला का पावला?

माझ्यात जो होता म्हणे
आत्मा मला ना गावला


जन्मेन मी अजुनी पुन्हा
हा मोक्ष मज ना भावला


 


(जयन्ता५२)



 


गझल