'गालिब'च्या गजलेचा भावानुवाद

अजब - ⏱ १ मिनिट


कोणती इच्छा सफल होत नाही
कुणाचा चेहरा मला दिसत नाही...


मृत्यु निश्चित एकदा आहे तरी
रात्रभर का झोप मजला येत नाही?...


हसू यायचे परिस्थितीवर पूर्वी
मी अता कशावरही हसत नाही...


मी जिथे आहे तिथे आज मजला
बातमी माझी स्वतःची मिळत नाही!...


काहि कारण गप्प मी आहे खरा
अन्यथा का बोलणे  जमत नाही?...


मी मरेस्तो वाट बघतो मृत्युची
मरण येते; पण तरीही येत नाही... (अजब)


मूळ गजलः


कोई उमीद बर नही आती
कोई सूरत नजर नही आती...


मौत का एक दिन मुअय्यन है
नींद क्यूं रातभर नही आती...


आगे आती थी हाल्-ए-दिल पे हंसी
अब किसी बात पर नही आती...


हम जहां हैं वहां से हम को भी
कुछ हमारी खबर नही आती...


है कुछ ऐसी ही बात जो चुप हूं
वरना क्या बात कर नही आती?...


मरते हैं आरजू में मरने की
मौत आती है पर नही आती... (गालिब)

गझल