एक गझल प्रिय मित्र प्रमोद खराडे याची (संतोष कुलकर्णी यांची नव्हे)
मिटवून टाक आता दोघांमधील अंतर..
होवून श्वास माझा आता सदैव वावर...
नावावरी असावा माझ्या जरी गुन्हा हा...
हे एक हृदय माझे केले तुलाच सादर
गंधाळ तू जराशी त्या मोगर्याप्रमाणे
काट्यात आजवर जो बेजार जीव - सावर
छळले जरी जगाने , झिडकारले तरीही...,
करुणा हवी मनातुन,हृदयी अथांग सागर...
झाले तुझे शुभंकर येणे घरात माझ्या,
बघ चांदणे पसरले गगनामधील घरभर...
- प्रमोद खराडे, पुणे
(एक अनावश्यक (?) माहिती - अगदी व्यक्तिगत .. पण मोह आवरत नाही म्हणून प्रमोदची परवानगी गृहित धरून ... शेवटचा शेर त्याला मुलगी झाली तेव्हाचा..मुलगी झाल्यावर नाराज होणरे अनेक बाप मित्र भेटल्याच्या पार्श्वभूमीवर मला प्रमोदचा हा सामान्य माणसातील पुरोगामी अवतार मला कौतुकाचा वाटला. इतर शेरांचे मला माहीत नाही. ते प्फ्रमोदलाच विचारू शकता. बाकी, हा अनावश्यक व्यक्तिगत संदर्भ दिल्याबद्दल मला प्रमोद करील तसे आपणही माफ कराल, अशी आशा..अन्यथा शिक्षाही चालेल्....संतोष कुलकर्णी)
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा