माझा मलाच आता अंदाज येत नाही
आतून कोणताही आवाज येत नाही
डोळ्यात सागराच्या उठती अनंत लाटा
पण मूक, मूक सारे .... ती गाज येत नाही
आहेत तसाच ठेवा चित्रातही मला ह्या
माझ्याच चेहर्याची मज लाज येत नाही
जो सूर पाहिला मी तेव्हा मिटून डोळे
माझ्या गळ्यातुनी तो स्वरसाज येत नाही
बेभान जिंदगीची चढली अशी नशा की -
मृत्यूसही म्हणालो -"जा, आज येत नाही"
- सदानंद डबीर
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा