मिळो

बापू दासरी - ⏱ १ मिनिट

रहाया सुखाचे निवारे मिळो
जगाला सुगंधी फवारे मिळो


कुणी शाप द्यावे कुणाला किती
हरेकास येथे किनारे मिळो


सदा उंच न्यावा यशाचा झुला
नव्या वैभवाला मिनारे मिळो


जरी पाहिले ना कुणीही  किती
जुन्याला नवे हे भिणारे मिळो


बहरताच स्वप्ने कळ्यांची नवी
फुलाया फुलांना शहारे मिळो


बिजांना सुचावे नव्याने उगी
रुजाया पिकांना शिवारे मिळो


उघडताच डोळे दिपावे असे
पहाया शराबी चिनारे मिळो    - बापू दासरी

गझल