पाहिजे.....

अमित वाघ - ⏱ १ मिनिट

गझलेमधे जरासे नावीन्य पाहिजे.
नावीन्य आणण्याचे प्रावीण्य पाहिजे.

चर्चा तिचीच व्हावी दाही दिशांमधे;
गझलेत प्रेयसीचे लावण्य पाहिजे.

येईल मोल साध्या टीकेसही तुझ्या;
आधी तुझ्यात तितके नैपुण्य पाहिजे.

वार्ध्यक्य लेखणीला येवू नये कधी;
चिरकाल बहरणारे तारूण्य पाहिजे.

खांद्यावरी तुझ्याही बसतील पाखरे;
नजरेत फक्त थोडे कारूण्य पाहिजे.

अमित वाघ.
"गुरूमंदिर", सुधीर कॉलनी,
अकोला: ४४४००१. मो.क्र.: ९७६६६ ९७६६७; ९८५०२ ३९८८२.
संवेदना रायटर्स कम्बाईन,अकोला-४४४००१.


[ ही रचना अलामतीचे नियम पाळत नसल्यामुळे विचाराधीन करण्यात आली आहे --विश्वस्त]

गझल