.......................................
...पण सुरूच आहे रहदारी !
.......................................
रस्त्यावर मेली म्हातारी...
...पण सुरूच आहे रहदारी !
विचार यावर किती किती हा..
मी बनेन म्हणतो अविचारी !
मी जगात माझ्या रमलेला...
मज नको तुझी दुनियादारी !
हृदयाची होते मेंदूशी
का आजकाल मारामारी ?
मज विसर पडू दे दुःखांचा
ये, बैस जरा तू शेजारी !
चिंधीत जिण्याच्या या माझ्या
ही तुझी आठवण जरतारी !
काम कधी, तर मद-मोह कधी
तू हिंड मना दारोदारी !
- प्रदीप कुलकर्णी
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा