शौकीन का आहे

भूषण कटककर - ⏱ १ मिनिट

अपयश माझे इतके शौकीन का आहे
प्रत्येक यशाचे ते जामीन का आहे


टाळ प्रिये मजला डिवचू नकोस बघुनी
खोटे हसण्याइतका मी हीन का आहे


चारित्र्य पाहुनी ती लाथाडते प्रेमाला
तिला विचारा की ते मलीन का आहे


कवितेचे गणिताचे प्रेम पाहुनी कळ्ले
प्रत्येक गझल माझी विचाराधीन का आहे


मदिरा मी घेतलेली भलतीच गोड होती
डोळ्यात काहीसे मग नमकीन का आहे


जो भेटतो मला तो राजा बनून येतो
कळले असेल तुजला मी दीन का आहे


सूर्य गस्त घाली पाहून चंद्र बिचके
पृथ्वी मला समजले शालीन का आहे


भूषण कटककर


 


 


 

गझल