शायरी का न यावी

भूषण कटककर - ⏱ १ मिनिट

 मती गुंग व्हावी निशा जागवावी
तुला पाहुनी शायरी का न यावी


संजीवनी ही विनामूल्य आहे
वेणी मृताला तुझी हुंगवावी


नहाशील तू हाच अंदाज आहे
उगा का नदीला अशी धार यावी


बहारीत जी वेल येण्यास टाळे
तिलाही तुझी पाउले चुंबवावी


जिथे शर्करेचा तुटवडा दिसावा
तुझी पालखी लाडके चालवावी


 


 


 

गझल