सांगती सत्य ते पानावरती शब्द
आणती स्वतःला भानावरती शब्द
एवढ्याचसाठी चाले पुरता हट्ट
येवु दे सखीचा कानावरती शब्द
दाबले स्वरांना वाटे मज अंतस्थ...
काढती तरीही माना वरती शब्द
घेवुनी भरार्या धावे आशय ज्यांचा,
लिहितात काय ते यानावरती शब्द...?
डोलते कुणाच्या शब्दासरशी मुग्ध..!
...उमटला कुणाचा रानावरती शब्द...!
- प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी, उदगीर
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा