तरी हात हाती हवासा तुझा...

अमित वाघ - ⏱ १ मिनिट

कुठे रहिला अर्थ श्वासा तुझा....
अरे... होत आहे उसासा तुझा....

खरे.. व्यर्थ वाटेल खोटे पुन्हा..
पुरे.. खूप झाला खुलासा तुझा..

चुकीची तुला भेटली बातमी.!!!
तरी छान होता.. दिलासा तुझा..

कुठे पाळला आजवर शब्द तू..
कसाकाय ठेवू भरोसा तुझा...

जरी ओळखीही नसे आपली..
तरी हात हाती हवासा तुझा...

अमित वाघ.
''गुरुमंदिर'', सुधीर कॉलनी. अकोला- ४४४००१.
मो. क्र. ९९२१६११६११; ९८५०२३९८८२.
www.gazalnavihotanna.blogspot.com

गझल