या दिलाचे हाल झाले
जे हवे ते काल झाले
वादळे झेलीत गेलो
ते कसे बेहाल झाले
आर्जवे केली किती मी,
का तयांचे जाल झाले ?
छेडताना स्वर सारे
ताल ते बेताल झाले.
पहिले ईश्कास जेंव्हा
वाटते कि साल झाले.
स्पर्शिले डाळींब जेंव्हा
ओठ का ते लाल झाले ?
- रमेश ठोंबरे
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा