उगीच का प्राण साचून जातो
नको तिथे जीव टाचून जातो
कसे तुला आज सांगू मना रे..
तुझाच सहवास जाचून जातो
पहा जरा चेहरा फक्त माझा
उरातले दु:ख वाचून जातो
जमीन माझी नसे, ना नभांगण
अधांतरी देह नाचून जातो
जगास मी दोष द्यावा कशाला ?
मनातला भाव काचून जातो
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा