ही माणसे घनदाट देवासारखी

निलेश कालुवाला - ⏱ १ मिनिट

मज भेटलीत अफाट देवासारखी
ही माणसे घनदाट देवासारखी

तू वाटले येशील देवासारखा
मी पाहिली मग वाट देवासारखी

आला कधी ,गेला कधी ,कळले न मग
केलीस तू ,वहिवाट देवासारखी

बोलावयास पर्याय मग होता कुठे?
तू मारली जर काट देवासारखी

जी काल वेड्यासारखी अन वागली
ती आज बिनबोभाट देवासारखी

सार्‍याच वाटा बंद झाल्यावर इथे
ही सापडे मग वाट देवासारखी

निलेश कालुवाला

गझल