ही सरिता रुसली आज किनाऱ्यावरती...
ही सरिता रुसली आज किनाऱ्यावरती
तू सदा कोरडा, मलाच नेहमी भरती
घडविण्यास पाषाणाची ललाटरेषा,
ह्या अनंत धारा अखंड त्यावर झरती
ते तारु बुडुनी अनेक वर्षे झाली,
पण हृदये त्यातिल अजुन जळावर तरती
रे सुटला कोठे छंद पंडु-पुत्रांचा,
द्यूतात आजही पांचालीला हरती
क्षितिजावर भास्कर जळास चुंबुन जाता,
लज्जेच्या रक्तिम लहरी लाटांवरती
मन टाहो फोडे नेत्र परी हे शुष्क,
ह्या वृत्ती माझ्या भेदभाव का करती?
-मानस६
ही सरिता रुसली आज किनाऱ्यावरती
तू सदा कोरडा, मलाच नेहमी भरती
घडविण्यास पाषाणाची ललाटरेषा,
ह्या अनंत धारा अखंड त्यावर झरती
ते तारु बुडुनी अनेक वर्षे झाली,
पण हृदये त्यातिल अजुन जळावर तरती
रे सुटला कोठे छंद पंडु-पुत्रांचा,
द्यूतात आजही पांचालीला हरती
क्षितिजावर भास्कर जळास चुंबुन जाता,
लज्जेच्या रक्तिम लहरी लाटांवरती
मन टाहो फोडे नेत्र परी हे शुष्क,
ह्या वृत्ती माझ्या भेदभाव का करती?
-मानस६
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा