कुणास नाही तरी मला तो दिसतो आहे
अजून कोणी तरी मनाशी वसतो आहे
मला असे भान भावनांचे.., पण हा वेडा,...
...धरून हातात इंद्रियांना हसतो आहे...!
मलाच माझ्या सुसाटतेचे भय का वाटे..?
कुठे पळावे.. किती पळावे...?..पुसतो आहे..
बटा तुझ्या आवरून घे ना, सखये, बाई...
सुगंध हा बावऱ्या मनाला डसतो आहे
कळे मला भास जीवनाचा छळतो आहे..!
..तरी पुन्हा श्वास घेत का मी फसतो आहे..?
पुन्हा कुणाच्या सभेत मी रे कसचा जातो..?
इथे मला मैफलीत जो तो हसतो आहे..!
उगीच का वाहवा मिळाली गझलेला ह्या..?
कुठेतरी मी मनात त्यांच्या ठसतो आहे
('मौनात एकट्याशी' मधून...) - प्रा.डॉ.संतोष कुलकर्णी, उदगीर
अलामतीतून मतल्यातच सुटका.....!
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा