कविवर्य सुरेश भट यांचा आज (14 मार्च) स्मृतिदिन.
त्यांना विनम्र श्रद्धांजली.
...........................................................
हाक
...........................................................
दालनात दालने नि दालनात दालने
एक देह...त्यात ही मनातली किती मने !
बासरी तुझी घुमे चहूकडे अजूनही...
राहिलीत ही तुझी इथे चुकून स्पंदने !
मोकळेपणातही जरा न मोकळेपणा...
घातली कुणावरी जरी कुणी न बंधने
ये निदान तू तरी...समीप ये, समीप ये...
तू कशास राहतेस दूर दूर वंचने ?
मी विचारले नभास, ` जायचे पुढे कुठे ? -
- संपले समुद्र सात...सात संपली वने...`
थांबवायचे कसे मनातले विचार हे....?
एकसारखीच ही सुसाटतात वाहने
मी चुकूनही कधीच ओ न द्यायचो, तरी -
हाक मारलीस का मला चुकून वेदने ?
- प्रदीप कुलकर्णी
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा