जीवनाशी भेटण्याचे राहिले
बंध अमुचे बांधण्याचे राहिले
पावसाळे यायचे अन जायचे
गीत माझे पेरण्याचे राहिले
ती व्यथांना माझिया सोसायची
दु:ख माझे पाहण्याचे राहिले
हरवलो तुमच्यामधे मी येवढा
मी स्वत:ला शोधण्याचे राहिले
मी सदा हसणार होतो जीवनी
आसवांचे थांबण्याचे राहिले
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा