सूर त्याचे, चित्त माझे, साद अन पडसाद आहे
तोकडा व्यासंग माझा; आसवांची दाद आहे
मी जुना झालो कधी? का? ते मला कळलेच नाही...
वेगळे संदर्भ आता खुंटला संवाद आहे
एक रस्त्याच्या कडेला फूल खोकत बोलले, "ह्या -
माणसांचा फार आता वाढला उच्छाद आहे!"
बंगले बांधा तुम्ही पण झोपड्यांमध्येच का रे?
...बापजाद्या दौलतीचा केवढा उन्माद आहे
देवधर्माने जगी होतेच की काही भले, पण -
कोणते नियमीत होते कोणता अपवाद आहे?
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा