तुला येतसे ते मला येत नाही
मला येतसे ते तुला येत नाही
उगी ना नटावे कधी कोंदणाने
तिचा दूरवर यार संकेत नाही
जया वाटते आपली आपलीशी
पडे तोंड कळताच हाकेत नाही
अशी प्रेयसी आणली शोधुनी मी
खर्या आशयाला दगा देत नाही
तिचे वागणे हे तिचे रूप आहे
अलंकार अंती कुठे नेत नाही
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा