स्थापता तुम्हीच मूर्ती घालता तरी साकडे
माणसे आहात की बिन शेपटीची माकडे
ती विचारे का धडकशी रे मला मी बोललो
चाललो नाकापुढे पण नाक माझे वाकडे
की जरी व्यवसाय असला एक दोघांचा तरी
मन धुवावे कविकडे अन कापडे परटाकडे
यार हो बघताय ना झाली कशी माझी तर्हा
अर्थ ना गझलेत केवळ मोजतो मी आकडे
काय इतका राग दैवा तू धरी माझ्यावरी
नेमकी माझ्याच वेळी का भिजावी लाकडे
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा