गझल

गझल

'चुकलो' म्हणेन मी तर सोकावतील सारे

'चुकलो' म्हणेन मी तर सोकावतील सारे
शिक्षाच शेकडोंनी ठोठावतील सारे

उल्लेख आपले तू वेळीच टाळ आता
येताच नाव माझे भंडावतील सारे

आडून ओढणीच्या उगवेल चंद्र माझा
डोळ्यांमधून तारे डोकावतील सारे

डोक्यात आग जेव्हा पेटेल भाकरीची
करतील ज़ाळपोळी,थंडावतील सारे

सोडून साथ माझी गेली दलाल दु:खे
बाज़ार वेदनांचे मंदावतील सारे

(पूर्वप्रसिद्धी: मनोगत

गझल : प्रा.रुपेश देशमुख

सेकंदाच्या काट्यावरती जिवास ठेवा
जगण्यासाठी एक निरंतर प्रवास ठेवा.

हवा कशाला आनंदी आनंद नेहमी
दिवसाकाठी दोन्-चार क्षण उदास ठेवा.

लोकहिताच्या सर्व योजना खाउन टाका
कगदावरी दाखवायला विकास ठेवा.

निर्भय होउन लुटून घ्याव्या सर्व चांदण्या
पायाखाली शहारलेल्या नभास ठेवा.

निरोप घ्यावा तिचा कोरड्या डोळ्यांनी
थोडे कातर, थोडे हळवे स्वरास ठेवा.

मनातल्या

का सूर नवा हा छेडत जाते भासांची वीणा ?

का सूर नवा हा छेडत जाते भासांची वीणा ?

कोणीतरी रोज कसली ही युक्ती लढवत असते..
श्रींमंत श्रींमंत होतात नि गरिबी वाढत असते!

तो आला तो गेला हे मी नुसते बोलत असते
भेटला मला तो नाही हे कोठे सांगत असते?

का सूर नवा हा छेडत जाते भासांची वीणा ?
येशील

नाचली काळीज ते पेलीत काही माणसे

दंगली पाहूनही मेलीत काही माणसे
राहिली गांधी तुला झेलीत काही माणसे

केवढी ती प्रीत काळी आंधळे काळीज ते
नाचली काळीज ते पेलीत काही माणसे

उंच राही देव आणी अंतही आहे मधे
पायरी बांधायला गेलीत काही माणसे

नागवा वेडा कपी त्यानेच बी हे लावले
पोचली कोंभातुनी वेलीत काही माणसे

आसवे माझी

तळ

तळ मनाचा खोदतोय;
मीच मजला शोधतोय.

भोवती बहिरा जमाव;
मी किती झंकारतोय.

नाव त्याचे घेतलेस;
मज उखाणा हासतोय.

तू अता येऊ नकोस;
मी मला सांभाळतोय.

आज गझले घे मिठीत;
प्राण माझा भटकतोय...

पांडुरंगा

पांडुरंगा

का भक्त आज सलतो भगतास पांडुरंगा ?
का देव आज दिसतो धनिकास पांडुरंगा ?

अधिकार श्रेष्ठ ज्यांचा अध्यात्म सांगण्याचा
तो का सुखात ठेवी दु:खास पांडुरंगा ?

ही सावली मठांची ढोंगी पुन्हा निघाली
ना किर्तनासी यावे तूर्तास पांडुरंगा !

पाण्यात कोरडी ही आतून चंद्र्भागा
अभिषेक आसवांचा चरणास पांडुरंगा !

कुठल्या

काळोख

काळोख

मी ओठ बंद केले दु:खास दाबण्याला !
प्रत्येक घाव बोले दु:खास सांगण्याला !

आरोप ठेवले का मजवर नवे नवे तू ?
झालो तुझा पुरेसे कैदेत ठेवण्याला !

मृत्युस समजलो मी आघात यातनांचे
जगणेच क्रूर होते हासून मारण्याला !

ते रंग फासलेले चेहरे हताश दिसती
का आरशात बघती स्वप्नास तारण्याला

कदाचित

सरेल एवढा प्रहर कदाचित
तुला पडेलही विसर कदाचित

पुन्हा कधीतरी समीप येता
तुझी वळेलही नजर कदाचित

समोरुनी तुझ्या निघून गेलो...
(तुला नसेल ही खबर कदाचित!)

करेल शांत या मनास आता
तुझ्या कुपीतले जहर कदाचित

अजून मी बजावतो मनाला-
नसेल उंच ते शिखर कदाचित....

बुजेल एक एवढी जखम अन
बनेल पूर्ववत

सजा

उदासी नसे, मौन हे बोलते
खुशाली विचारी मला रोज ते!

दिले सोडुनी मी मनाला, जसे
प्रवाहात कोणी दिवे सोडते

धरेला नकोशी असे काय मी?
खचे ती, जिथे पाय मी रोवते!

अरे चित्रगुप्ता, जरा सांग ना,
कसे पुण्य अन् पाप ते कोणते?

पुराव्यानिशी सिद्ध निष्पाप मी,
न केल्या गुन्ह्याची सजा भोगते!

जायला हवे !

.................................................
...जायला हवे !
.................................................

मन विसकटून, चुरगळून जायला हवे !
जगणे जरा तरी मळून जायला हवे !

हे दोन-चार कोरडे तरंग तेच ते ...
सारे तळेच खळबळून जायला हवे !

नक्की कधीतरी जमेल...आज ना उद्या...
फुलल्याविनाच दरवळून जायला हवे !

माझे तुझ्याविना न पान हालते जरी...
मी एकटेच सळसळून