कविता आरशाचे काम करते. ती स्वच्छ व निकोप चेहरे दाखवते आणि लबाड व घाणेरडे चेहरेही दाखवते. केवळ नक्षीदार शब्दांमुळे कवितेत यश मिळत नसते. सुबक, गोंडस व नक्षीदार शब्दांमुळे कविता सुंदर होत नसते आणि शब्दांचा थयथयाट घातला म्हणून कविता शक्तिशाली बनत नसते. 

भटांवरचे लेखन

भटांवरचे लेखन

भटसाहेबांच्या सहवासात...

कविवर्य सुरेश भट ह्यांचा आज (१५ एप्रिल १९३२) ८५ वा जन्मदिन. त्यानिमित्त... 

आपण एका अद्भुत काळात जगत आहोत, एका ऐतिहासिक कालखंडाचे साक्षीदार आहोत, ही जाणीव तो काळ जगत असतानाच माणसाला परिपूर्णतेनं होती तर ?...तर त्या वेळच्या अनुभवांद्वारे स्वतःला आणखी समृद्ध करून घेता आलं असतं...त्या वेळी महत्त्वाचे न वाटलेले; पण पुढं

माझा भाऊ सुरेश-२

प्रा. हबीब-उर्-रहमान सिद्दिकी हे उर्दू-फारशी, अरबीचे प्रकांडपंडित होते. ते मूळचे उत्तर प्रदेशातील मेरठचे. नोकरीनिमित्त ते अमरावतीत आले होते. त्यांची सगळी मुले उच्चशिक्षित. त्यांचा मोठा मुलगा अलहाज वलीभाई हा सुरेशच्या मुंजीला आला होता. त्याला मराठी चांगले येत होते. त्यानेच सुरेशला, तो गझल मराठीत लिहीत आहे, हे समजावून सांगितले. उर्दू गझल कशी

भटसाहेब ३

मला आठवतंय, भटसाहेब त्या काळात `मेनका` या मासिकात गझलिस्तान हे नवगझलकारांच्या गझलांचे सदर मोठ्या हिरीरीने चालवीत असत. ती त्यांची एक गझलविषयक लढाईच होती म्हणा ना ! मराठी गझल हे भटसाहेबांचे जीवितध्येय होते. त्यांच्या डोक्यात, मनात गझलेशिवाय दुसरा विचारच बहुधा नसे. अस्सल, खरीखुरी मराठी गझल मराठी मातीत रुजावी, यासाठी त्यांनी हाती

भटसाहेब २

हा कवी आपल्यापेक्षा वयाने आणि इतर सगळ्याच गोष्टींनी खूप म्हणजे खूपच छोटा आहे,  त्याला कशाला कळवायचे आपली गझल पूर्ण झाल्याचे, असे त्यांच्या मनात चुकूनही कधी यायचे नाही... ते सरळ पत्र लिहून मोकळे व्हायचे...एकदा तर छोट्या वृत्तातील एक गझल त्यांना सुचली आणि त्यांनी ती लागलीच मला पत्रातून पाठवून दिली. त्या गझलेचे

भटसाहेब १

 

`एखादा होतकरू गझलकार आढळला तर मला लॉटरी लागल्यासारखा आनंद होतो`, असे म्हणणारा कवी आपले सारे आयुष्य केवळ कवितेसाठी, गझलेसाठीच जगला असणार, हे पुन्हा निराळे सांगायची आवश्यकता नाही...

महाराष्ट्र साहित्य परिषदेने `मराठी गझल` या विषयावर १९८६ साली विशेषांक काढला होता. त्या विशेषांकात कविवर्य सुऱेश भट यांची प्रमुख आणि प्रदीर्घ मुलाखत

भटांशी भेट : केदार पाटणकर

`माझ्याकडे वळून म्हणाले, "आता तू ऐकव". मी सुरूवात केली,"जीवनाला मी कुठे नाकारले?जे जसे आले तसे स्वीकारले....मतला संपतो न संपतो तोच ते म्हणाले,"ते जसे आले तसे स्वीकारले!" केवळ एका अक्षराचा बदल करून त्यांनी मतला एकदम टोकदार केला होता. अवघ्या एका निमिषात. प्रतिभा म्हणजे काय, हे मला झटक्यात समजले.

              गझला लिहू

'मग माझा जीव'ची आठवण

'रंगुनी रंगात सार्‍या, रंग माझा वेगळा' ही सुरेश भटांची कविता स्वरबद्ध केल्यानंतर या एका छंदात मन खूप रमू लागलं. पुण्यातल्या निरंकुश आयुष्यात तसा खूप वेळ असायचा. कविता सोडून इतर काही लिहिण्याचा विचारही मनात नव्हता. कविता सटीसामाशी आणि तिची लहर लागेल तेव्हाच भेट द्यायची. त्यामुळं एरवी माध्यमांशी थोडाबहुत संपर्क, वाचन, मुख्यतः

दोन विडिओ

असेच एकदा इंटरनेटवर  वर शोध घेता मला कविवर्य भटांचे पुढील दोन विडिओ सापडलेत. हे विडिओ या संकेतस्थळावर असावेत असे वाटले, म्हणून पाठवीत आहे. खालील दुव्यांवर टिचकी देऊन विडिओ पाहावेत.

  1.  http://www.youtube.com/watch?v=Ix-N5ZdeRf0
  2.  http://www.youtube.com/watch?v=sNyjRht5pgg&mode=related&search=

माझ्याकडून या संकेतस्थळाच्या उपक्रमाला मनापासून धन्यवाद.

प्रमोद हरदास

आयुष्य तारण राहिले...

एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण राहिले...

इतकेच मला जाताना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते
***
अशी ही शेवटी माझ्या जिण्याची संपली यात्रा
जिथे मी भेटलो होतो तिथे मी थांबलो नाही!

अशा अनेक ओळींत मरणकल्पना मांडणाऱ्या सुरेश भटांना ही जाण्याची कल्पना ' मोह ' घालायची का

सुरेश - राम शेवाळकर

"सुरेशच्या धसमुसळ्या व आडदांड व्यक्तिमत्त्वाचा हा कोवळा पैलू मला अपरिचित होता. या ओबडधोबड पहाडातून प्रतिभेचा जिवंत झरा झुळझुळत असेल अशी तोपर्यंत मला कल्पनाही नव्हती. या कवितेने सुरेशचे आणि माझे गोत्र जुळले. करुणेने आणि प्रायश्चित्ताच्या भावनेने सुरू झालेली आमची मैत्री कवितेमुळे अधिक सांर्द्र झाली."

प्रा. राम शेवाळकर ह्यांच्या 'उजेडाचे झाड' पुस्तकातील