-----------------------
रहावी सदा तू फुलासारखी,
घरंदाज, मोठ्या कुलासारखी..
मला जोडशी तूच माझ्यासवे,
मला भासते तू पुलासारखी..
वटारून डोळे पहावेस तू,
अशी चूक व्हावी, मुलासारखी !
जशी बोच आहे मला अंतरी,
तशी राहते का तुला, सारखी?
अकस्मात ये तू मला भेटण्या-
सुखासारखी वा शुलासारखी...
------------------------
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा