वायदे करती हजारो पाळणारे शोधतो
माणसाला माणसागत मानणारे शोधतो
बोलणारे भेटले अन् ऐकणारे भेटले
बोलल्याविण अंतरीचे जाणणारे शोधतो
दोन शोधा चार मिळती सूख असता सोबती
दु:खही दिसता जरासे थांबणारे शोधतो
बाह्यरुपाला बघोनी लायकी ठरते जिथे
कातडीच्या आतलेही पाहणारे शोधतो
जाहल्या जखमा कहाण्या यातना झाल्या जुन्या
मी नव्याने घाव आता घालणारे
गझल
गझल
वायदे करती हजारो
ही तुझी माझीच आहे गोष्ट पण
चेहरा सारे खरे ते सांगतो
याचसाठी आरसा मी टाळतो
वेगळे घडणार अंती जाणतो
मी तरी अंदाज माझे बाधतो
कोंडली मी वादळे माझ्यामध्ये
फुंकरीने मात्र मी घायाळतो
माळरानावर मनाच्या एकटा
मी कुणाची वाट आहे पाहतो
यायची असतेस तेव्हा का मला
काळ थोडा थांबल्यागत वाटतो
एवढा साधा नसावा प्रश्न तो!
उत्तराला वेळ आहे लागतो
ही तुझी माझीच आहे
फालतूपणा
जुना किल्ला मनाचा, बुरुजही उध्वस्त झालेले
शिपाई सर्व आशेचे पुरे सन्यस्त झालेले
बरे ज्याचे करावे तो म्हणे माझे खरे आहे
फुका जाणार ते लावण्यही मदमस्त झालेले
निघाली योजना 'एकावरी घ्या एक' देवाची
लुटा जन्माबरोबर मरण आता स्वस्त झालेले
नशा मी भूतलाची एवढी उपभोगली की बस
पुन्हा चक्रात आले मोक्षवासी त्रस्त झालेले
पुढे जो काळ आहे
काय सांगू
काय सांगू कसे मी कुणाला?
भ्यायले चांदणे गारठ्याला
रक्त माझे असे का पेटले?
झेलता मी जरासे उन्हाला
गंध दाटून येता स्मृतींचा
फूल यते कसेरे फळाला?
आसवांचा सदा घोळ आहे
ऐनवेळी कोंडती घशाला
भ्रमर येथे कशाला फिरे तो?
बाग रागावली रे फुलाला
तृप्त झाले अशी मी लिहोनी
आज घेते गझल ही उशाला
ही भूमी
संतांची ही भूमी आहे
भक्तांची ही भूमी आहे
गेले फाशी देशासाठी
वीरांची ही भूमी आहे
हिंसेला जिंकू शांतीने
गांधींची ही भूमी आहे
नारी आहे देवी येथे
सीतेची ही भूमी आहे
गाणी गाती स्वातंत्र्याची
पंतांची ही भूमी आहे
नाही थारा गद्दारांना
सार्याची ही भूमी आहे
चांदणे प्रेमातले....
चांदणे प्रेमातले....
हे भासही प्रेमातले, हे वागणे प्रेमातले
जे प्रेम ह्रदयी दाटले, ते मागणे प्रेमातले..
तुझी लाज ही डोळ्यातली अन् हासणे गालातले
स्वप्नामधे तूज पाहणे, अन् जागणे प्रेमातले..
हा चांदवा चेहरा तूझा अन् रात्र तव केसांपरी
बेधुंद तुजवरी मी सखे, अन् चांदणे प्रेमातले..
ही सोबतीला साथ तुझी अन् चालणे प्रेमातले
इच्छा ..
पुन्हा भेट घेण्या पुन्हा आठवावे
बसाव्यात गाठी नि गुंते सुटावे
तुझे ध्येय गगनात घेण्या भरारी
तुझ्या आठवांना तुझे पंख यावे
जशी काच असते पुढे आणि मागे
तुला मी - मला तू तसे ओळखावे
चमकले सितारे नभीचे हजारो
कसे गीत धरतीवरी आळवावे ?
पुरे जाहले रे तुझे तेच रडणे
अता मी
पुन्हा...
कळले जमीन नांगरायला पुन्हा हवी...
हृदयांत वेदना उगायला पुन्हा हवी
होती सुखात थंड भावना, अता कळे...
दु:खे अजून पांघरायला पुन्हा हवी
बोटे धरून चालती लहानगी मुले...
पण प्रेयसी तशी सुटायला पुन्हा हवी
शस्त्रें मनास छेदुनी अभंग गायली...
ओवी तशीच आळवायला पुन्हा हवी
जपली जुन्या-नवीन खेळण्यांत भावना...
ती माणसांत आज यायला पुन्हा हवी
अशी वेळ आणू नको
मी जिंकताना तुला हारवावे अशी वेळ आणू नको
मी जिंकल्याचे तुला ना कळावे अशी वेळ आणू नको
आता कुठे होत आहे सुरू रात, बेहोष व्हावेस तू
ओल्या पहाटे तुला भान यावे अशी वेळ आणू नको
लाजून थोडी जरा दूर होता तुला आवरेनास तू
त्याच्यापुढे मी तुला लाजवावे अशी वेळ आणू नको
रोमात
ठुमरी
पूर्वी होती तितकी आता 'ती'ही उपरी नाही जखमा सगळ्या भरल्या किंवा मी जखमांनी भरलो
एक खरे की आता कुठली जागा दुखरी नाही मास्तर विझलेले अन बेचव चोथापाणी शिक्षण
घडते रडके जगणे जेथे शाळा हसरी नाही मॉल उभा झाला अन बसला त्याचा कुडमुड धंदा
प्रगतीच्या व्याख्येमध्ये म्हादूची टपरी नाही जगणे आता