गझल

गझल

सीमेवरती...

उभी राहिली जेंव्हा नाती सीमेवरती
क्षणात घडली, क्षणात विरली ... सीमेवरती

जिला ठेविले हृदयामधुनी जन्मोजन्मी
ठरवत होतो भेट घ्यायची ... सीमेवरती

थंड मनाने घरीच ती झोपली सुखाने
तेंव्हा उठल्या ज्वाळा काही ... सीमेवरती

मनामनांची भाषा ज्यांना समजत नाही
ते करती विश्वाची होळी ... सीमेवरती

अन्यायाला वाचा फुटते कणाकणातुन
ठरत नसे

मान्यवरांची गझल-डॉ. संतोष कुलकर्णी

तेच  ते,तेच  ते, सांगतो-
का  तुझ्याशी  असा  वागतो?

ऐकुनी ही  तुझे  ,तेच  ते...
का  मनाशी  हसू  लागतो...?

दे  तुझा  हात , अन  साथ ही...
मागणे  सारखे  मागतो...

चांदणे  वेचतो , चंद्र  हा...
मी   उगा  पाहतो , जागतो...

सावलीला  तुझ्या , मी  उभा
पावलांशी  तुझ्या  रंगतो...

मागतो  चंद्र  मी  तेवढा...
...काय  आभाळ  मी  मागतो,

फूल  तू-!  भोवती  मी  तुझ्या
मुक्त  गंधापरी  पांगतो...

 

गंधार


चांदणे भासे जरी अंधार आता
मागती गात्रे सखी श्रूंगार आता  

सावली चंद्रावरी कोठून आली
मोकळा केलास तू संभार आता

धुंद गंधाने खूळा बेभान वारा
रातराणी चेतवी अंगार आता

कोणती आहे तुझ्या स्पर्शात जादू
डोलती का संयमी मंदार आता

श्वास झाले सूर माझे तापलेले
पैंजणे गाती तुझी गंधार आता


हॉटेल पॅराडाइज, पुणे. दि. १९.०१.०९ रात्री ११.३०

पाहणे लाजून खाली अन कसेसे हासणे
विसर पुर्वी जाहलेले, सोड परके भासणे

काय ही मागासण्याध्ये पुढाकारी तुझी?
की पुढाकारीच माझी त्यामुळे मागासणे

मी तुझ्यासाठी न आलो, माझियासाठी न तू
काय मी आ वासणे अन काय तूही त्रासणे

वाचला मसुदा तरीही घेतले कंत्राट मी
मी तुला आरासणे अन तू तुला जोपासणे

..चर्चा

====================

नाही  अजून  झाली, माझ्या-तुझ्यात  चर्चा..
माझ्या-तुझ्यातल्याची .. सार्‍या  जगात  चर्चा

आता  कुठे  जरासे  संकेत  मोडले  तू
आता  कुठे  जराशी  आली  भरात  चर्चा..

येणार ती  पुन्हा रे.. ठोका चुकेल  ना रे..?
छातीत  स्पंदनांची  आपापसात  चर्चा !

भेटूनही  न  वाटे  मित्रास  भेटल्याचे
पेल्यात  व्हायच्या  त्या, झाल्या  कपात  चर्चा

"आधी  असा  न होता

कहाणी

कसे  बोलू  जुने  सारे  मला  ते  आठवेनारे
कसे  गाऊ  तसे  गाणे  मला  ते  गाववेनारे

पुन्हा  गोष्टी   पुन्हा  गीते  कशाला  चन्द्र  हा  उगवे?
उशाला  चांदणे  गंधीत  ते ही  प्राशवेनारे

कशाला  बोलणे  काही  कळावे  अर्थ  श्वासांचे
उन्हाने  केतकी  फुलली  झळा  या  सोसवेनारे

कुणाला  सांगते  कोणी  मनोरा  कोसळे  कैसा
निळ्या  उध्वस्त  स्वप्नांचे  ढिगारे 

रजनीगंधा

रजनीगंधा  उमलत  जाता  नव-वर्षाचा  नाचे  मोर
सरत्या  वर्षा  निरोप  देउन  निजे  जुईची  नाजुक  पोर

वर्षे  येती  आणिक  जाती  तुम्ही  वेगळे  केले  काय?
ज्याला -त्याला  टोचुन  पुसती  बाभुळ  आणी  खट्याळ  बोर

पुरे  जाहल्या  चो-या मा-या  हा  कंठा  घे  शेवटचाच
पुन्हा  तेच  ते  प्रियेस  सांगे  भल्या  पहाटे  कोणी  चोर

लेकुरवाळी  कण्हेर  यंदा 

मान्यवरांची गझल-संगीता जोशी

मुळीन  न  केला  विचार  तेव्हा
खुशाल  केला  करार  तेव्हा


घडू  नये  ते  घडून  गेले
गुन्हे  तसे  दोन-चार  तेव्हा


अशी कशी  हारले , कळेना
न  खेळताही  जुगार , तेव्हा


जपून  मी  ठेविला  मनाशी
दिलास  जो  तू  नकार  तेव्हा


मला  खरे  वाटलेहि  होते
तुझे  बहाणे  हुशार  तेव्हा


अता  विचारू  नका  खुशाली
तुम्हीच  केलेत  वार  तेव्हा

काय या छातीत श्वासाला मिळे

रे नका येऊ कुणीही मोडता घालायला
चाललो आहे स्वतःला आज मी समजायला

वासना, हेवा, अनीती, स्वार्थ, लाचारी, दगा
जन्म गेला 'काय आहे मी' मला उमगायला

चारचौघांसारखा हा देह आहे लाभला
चारचौघे त्यामुळे येतील खांदा द्यायला

विश्व हे माझ्याचसाठी निर्मिले आहेस का?
सारखा जातो कसा मी फायदा काढायला?

मी तरी आहे मला हेही

अंतरे राखूनही ...

अंतरे राखूनही तू आज माझ्या काळजाला छेडले
मोकळी असले तरी बेताल तुझिया आठवांनी घेरले

माहिती होते मला उत्सूक नाही तू जराही भेटण्या...
वास्तवाचे भान असुनीही तुला स्वप्नी जरा मी भेटले

चांदणे आकाश भरुनी वाहते आहे, जशी गंगा इथे -
मुक्त करते पापियांना तेज तैसे वाढते चंद्रातले

सांजवेळी सूर्य कलता जीवनाचे