हा बंद ही, यशस्वी, छापा पुन्हा रकाने
आम्हास ही जगू द्या, का बंद कारखाने ?
वेडे कसे तुम्ही हो, अर्धाच वार केला
शोधीन मी तुम्हाला, आता कसा दमाने
आधी मला कळू दे, जे प्राक्तनात आहे
करतोस तू कशी रे, ओली सुकी मुक्याने ?
व्हा दूर कुडमुड्यांनो, सांगू नका जराही
काढून ठेवलेले