गझल

गझल

केवढी आग लागली होती

   


  तू जिथे आस सोडली होती
   वाट तेथेच संपली होती

मौन होती हवा अशी काही
पावरी दूर वाजली होती

घेऊनी दूर-दूर डोळ्याना
लाट एकेक चालली होती

ओठ हलले तुझे जरा होते
हाक अर्ध्यात लोपली होती

श्वास मी फुंकला जराशाने
केवढी आग लागली होती....

अनंत ढवळे ( ...पानगळीतून )

नकोच जाऊ तिथे अता तू

नकोच जाऊ तिथे अता तू विस्कटलेली पिसे बघाया
जखमेवरती मीठ चोळूनी  खोटेखोटे उगी रडाया

ना अश्रू ते, खारे पाणी तुझ्या स्वतःच्या रडगाण्याचे
मिठागरातुन ठेव भरोनी अळणी भोजन बरे कराया

प्रीती म्हणजे नव्हे मोगरा, गुलाब तो तर काट्यामधला
गाली नाही नेत्री फुलतो ह्रदय घेउनी येच पहाया

तुझी आसवे इतुकी निर्मल वाहुन नेती

जसे काल होते तसे आज वाटे

रित्या मंदिरी चाळ - पखवाज वाटे
तिथे तुणतुणेही अता झांज वाटे

मिळे दाद नृत्यांस वा! व्वा!! फुकाची..
न तोडा, न ठसका, न तो बाज वाटे

कुण्या गावचा मीच माजी भिकारी
तरीही उगा द्यायची लाज वाटे

असे काळजाचे सदा होत तुकडे
प्रिया 'होय' म्हणताच कोलाज वाटे

नको दाखवू नवनवे रोज काही

पहिल्यासारखे

श्वास पहिल्यासारखे, नि:श्वास पहिल्यासारखे
लाडक्या येतील का मधुमास पहिल्यासारखे?

पाहणे मी वाट, येण्याची तुलाही ओढशी
आजही होतात मजला भास पहिल्यासारखे

आवरावे मी तुला, ना आवरावे तू मला
छेड आधीसारखा, दे त्रास पहिल्यासारखे

आजही मी काळजीने केस विंचरते उगी
शोधते केसांत गुंते खास पहिल्यासारखे

कष्टणे दिवसा, तुझे झोपू न देणे रातचे
एकदा

अलामत? सोड चिंता तू.....

तुझे चालेल आरामात 'भूषण' ,सोड चिंता तू
न चिंतांची तुला काहीच चणचण, सोड चिंता तू

तुला जे शक्य आहे तेवढे दे अन रिकामा हो
जमाना बैलही मागेल गाभण, सोड चिंता तू

'मगाचा जाब पुसणारा' नसे हा वेगळा आहे
पुन्हा चालेल आता तेच कारण, सोड चिंता तू

मला दररोज किस्मत टाळते

तुझे ठसे...

[ गंभीर  समीक्षकांच्या  विनंतीस  मान  देऊन.. !]

====================

पहा कधी  ना  कधी  असेही  घडेल  काही..
नसेन  मी, त्यामुळे  तुझेही  अडेल  काही !

तुझे  ठसे  चेहर्‍यात  माझ्या  नकोस  शोधू,
(मनात  कोठेतरी  तुला  सापडेल  काही !)

"कुठे  असावा  जुना  जिव्हाळा?"कळेल  ते ही,
तुला  चांदणे  बनून  जेव्हा  जडेल  काही..

अढी  जराशी, ललाटरेषा  बनून 

नेहमीचेच सारे


बोललो दुःख हे नेहमीचेच सारे
काय होते विनोदी ? हसावेच सारे ?

भेटले सोयरे, काय त्यांना म्हणू मी
गारदी आमचे ओळखीचेच सारे

पुण्य माझे कसे तू खरडशील देवा
कर्म जे तू दिले ते चुकीचेच सारे

काल ही माणसे लांब लांबून गेली
श्राध्द जेवायला आज आलेच सारे

सावल्या त्रास देती करू

तसे नसेलही !

 

...................
तसे नसेलही !
....................

तसे नसेलही; मला उगाच वाटले तसे !
असो ! कधीतरी चुकून व्हायचेच हे असे !

खऱोखरीच एकरूप जाहलो तुझ्यासवे...
तुझेच  रूप दावती उगाच काय आरसे ?

लपाछपी  मनात या अशी सदैव चालते......
कधी उदास वाटते; कधी प्रसन्न छानसे !

हवे तसे जगायचे असेल स्वप्नही जरी...
हवी

लोकांमधल्या प्रतिमेला...

लोकांमधल्या प्रतिमेला सांभाळत बसलो
मी इथल्या नियमांना सार्‍या पाळत बसलो 

सगळे पुस्तक वाचायाची हिंमत नव्हती
निवडक निवडक आठवणींना चाळत बसलो 

ये दुनिये, घे शेकोटीची ऊब आयती
हा बघ येथे प्राणाला मी जाळत बसलो 

दूरदूरचा नको एवढा विचार केला
पावलातल्या दगडाला ठेचाळत बसलो 

प्रत्येकाने कविता केली, दाद मिळवली
मी केवळ दुःखाला

खूप वाकडा गेला


नवे नकोस करू आता तू वादळ जाता जाता
पूस तुझ्या गालावरचा तो ओघळ जाता जाता

तुज भेटुन हृदयावरती सुख धरते बिनसवयीचे
घेउन जा जी दिलीस तू ती अडगळ जाता जाता

उशीर झाला कळायला आयुष्याची समिकरणे
घे हिरवळ येताना तू, ने मरगळ जाता जाता

आश्वासन जीवन माझे घेउन आले अन गेले