गझल

गझल

...लुप्त

------------------------
झरे  आसवांचे  कसे  लुप्त  झाले?
थवे  आठवांचे  कसे  लुप्त  झाले?


जशी  लुप्त  होते  समुद्रात  नौका,
तुझे  नाव  आता  तसे  लुप्त  झाले..


अशा  लोपल्या  आज  आणा  व  भाका,
जसे  घेतलेले  वसे  लुप्त  झाले..


नको  शोध  घेऊ  पुराण्या  खुणांचा
तुझ्या  पावलांचे  ठसे  लुप्त  झाले..


उरातून  गेली  अशी  'हाय' माझ्या,
तिचे  सांजवेळी   हसे  लुप्त  झाले..!


--------------------------

खेळ

माकडांचा खेळ करतो हा मदारी
अन् पुढे त्याचाच का होतो भिकारी ?

जीवनाचे मर्म जगती सांगण्याला
वेदनांची आजही वाजे तुतारी

सांत्वने करुनी जगाला धीर देता..
तोच का बनतो पुन्हा त्यांचा शिकारी ?

काय केले पाच वर्षे आसवांनी ..?
नाव ना बुडली, न ती लागे किनारी

माप घेऊनी चला काही मणांचे

साधवी...

साधवी... ( गझल )

शब्द माझे मानसी होणार केव्हा?
काव्य माझे कौमुदी घडणार केव्हा?

का असा लांबून माझा ध्यास घेते?
बाहुपाशी तू सखे जडणार केव्हा?

का जगाला टाळतो नाना प्रकारे?
मी स्वयंभू पूर्णतः बनणार केव्हा?

मी तुझ्यासाठीच माझे शब्द वेचू;
तू अशी जादूगरी करणार केव्हा?

मोह-मायेच्यामधे, पुरता बुडालो;
सांग देवा

अजरामर....

अजरामर....

तुझे आभास घेवोनी, निशेला जागतो आहे...
तुझी स्वप्ने जराशी मी, उशाशी सांडतो आहे...

तुला खात्री नसे याची, म्हणोनी आज रक्ताने;
तुझी-माझी कहाणी ही, नभावर मांडतो आहे...

तुला मी काय सांगू अन्, तुला मी काय समजावू?
तुझ्या आत्म्यात आता मी, स्वतःला शोधतो आहे...

सखे गं फार झुरलो मी, तरी संपून

ती मजा ना राहिली

आज मी जगण्यामधे ती मजा ना राहिली
रोजचे मरण्यामधे ती मजा ना राहिली

कोवळे सुकुमारसे, दु:ख देता का कुणी?
अश्रु आवरण्यामधे, ती मजा ना राहिली

या मला जिंकून जा, खेळ खेळू वेगळा
खुद्द मी  हरण्यामधे, ती मजा ना राहिली

काळज्या म्हणती म्हणे, राठ झाला कोडगा
यास भादरण्यामधे, ती मजा ना राहिली

त्या तुझ्या

ये तुला मी भेटतो...

दु:ख कंटाळे, म्हणे, रोज का मी भेटतो?
तेच येते सारखे, बावळा मी, भेटतो!

येत जा तुम्ही इथे, त्यात माझा फायदा
भेटलो तुम्हास मी, की मला मी भेटतो

फूलविक्रेता म्हणे, फार मंदी चालली
की तिला हल्ली कुठे, फारसा मी भेटतो?

कोण आनंदी कुठे, नी समाधानी कुठे
शोधुनी कोणी असा, प्यायला मी भेटतो

आठवण

नांवही आता नुरे

जन्म घेणे, संपणे, यामधे जे चालते
त्या उठाठेवी किती, केवढाले हाल ते

नांवही आता नुरे, शायरी संग्राम हा
हो दिवाभीतापरी, शूर होते काल ते

खड्ग म्यानातून जे, काढती ते वारले
शेवटी जगले बघा, वापरी जे ढाल ते

ओढणी घेऊन जा,भोवताली लोक हे
पाहुनी अश्शी तुला, व्हायचे कंगाल ते

राहिलो तस्साच मी

मनास केले असे मोकळे

मनास केले असे मोकळे,  क्षितीज उरले नाही

जरी एवढा प्रवास केला, गाव शोधले नाही
मनास केले असे मोकळे,  क्षितीज उरले नाही

टपटपणाऱ्या आठवणींना  बघून तेव्हा दारी 
भिजले मन  हे जराजरासे.. पण हळहळले नाही 

'उंबरठा  झाला पर्वत की रस्त्याने थांबवले?
भेटण्यास ना येण्याचे मज कारण कळले नाही

देठ मनाचा नाजुक पण तो  अजून ताठच आहे
(कोण म्हणाले मी सुमनांना

मीच राही एक देहाती इथे

केवढीही लाभुदे ख्याती इथे
होउनी जाशीलरे माती इथे

शाप, हेवा, राग, धोका,बोचणे
नांव यांना लाभले नाती इथे

धाप लागे मोजताना, एवढ्या
सागराचे शिंपले 'जाती' इथे

का बरे माझ्या मनाला खोदता?
काय आहे लागले हाती इथे?

लग्न उंटाचे असे साहित्य हे
भोवताली गाढवे गाती इथे

ती जरा लांबून जाते ते बरे
फार आगी बाळगे! वाती

कसा मेळ व्हावा?

------------------------
मला  एक  छोटा  दिवा  पाहिजे
तुला  चांदण्यांचा  थवा  पाहिजे


मला  ओढ  आहे  उन्हाची  तशी-
तुला  पावसाळी  हवा  पाहिजे


मला  मुग्धतेचा  लळा  लागला..
तुला  साजणी  मारवा  पाहिजे


मला  तू  हवी  रोजच्यासारखी,
तुला  रोजचा  'मी'  नवा  पाहिजे !


कसा  मेळ  व्हावा  सये  आपला??
मने  जोडणारा  'दुवा' पाहिजे...


-------------------------