गझल

गझल

...जन्म चकव्यासारखा !

.......................................
...जन्म चकव्यासारखा !
.......................................

भेटशी का सांग फसव्यासारखा ?
टाळशी का कर्जबुडव्यासारखा ?

या मनाचा कोणता आजार हा ?
वाटतो आराम थकव्यासारखा !

सोस तू आयुष्य मर्दासारखे...
सारखा रडतोस, हळव्या, सारखा !

अवनती ही आज उजव्याची किती...
भासतो डावाच, उजव्यासारखा !

पाळला जावा, असे आहे कुठे ?
शब्द हा

हळवा नकार - सौ. स्मिता दोडमिसे यांची गझल!

प्रिय गझल वाचकांनो,

ही गझल माझी नाही. माझ्या एक कवयित्री स्नेही सौभाग्यवती स्मिता दोडमिसे यांची ही गझल असून त्यांच्या परवानगीने व सूचनेवरून ती मी येथे सादर करत आहे. या गझलमधील आशय पूर्णपणे त्यांचा असून फक्त तंत्रासाठी काही किरकोळ बदल मी केले आहेत. आमच्यासरख्या नवोदीत गझलकारांना आपण उत्तेजन दिलेत तर आमचा

टाहो...

घेऊन मी तुला रे सजवीन रात माझी..
पण तू नको विचारू केंव्हाच जात माझी

जेंव्हा कुणा मिळाले ते जातकूळ सारे..
राती अनेक सजल्या सोडून बात माझी

चौकात त्यागला मी.. हा व्यर्थ देह अंती..
तेंव्हा कुठे निघाली ! ...  पहिली वरात माझी

पाठीवरी वळांचे पाहून रंग आता...
कळले कि मीच केली

नूर...

आर्त माझी हाक नामंजूर आहे
ती सदासाठीच जाते दूर आहे

वाजवावी शीळ बाकीच्या कुणीही
आमचा हरवून गेला सूर आहे

ठीक बाकी भासती माझ्या घराच्या
एक खिडकी मात्र ही भेसूर आहे

रोज येता जात असता वाटते की
आपली वस्ती किती बेसूर आहे

मी निरोपाला तिच्या जाणार नाही
ती असो, मी तेवढा

जुने, विसरून गेलेले...


-------------------------------------
कधी  रडवून गेलेले, कधी  हसवून गेलेले
पुन्हा  का आठवावे  ते, जुने विसरून गेलेले...

पुन्हा  सारे  तपासावे मला  लागेल एकांती,
कधी  जे वाटले होते मला  समजून गेलेले

कसे चुकले जरा माझे, मला  शिकवू  नका कोणी,
पहा , चुकलेत ते  सारे - मला  शिकवून गेलेले

पुन्हा  ती  भेटली  तेव्हा, जराशी  वेगळी  होती
इरादे  वाटले आता

गझल तालात चालावी

जरी बेताल मी माझी गझल तालात चालावी
सदा रंगीन वाटावी तिन्ही कालात चालावी

असावे मी नसावे मी तयाचे फारसे नाही
तिची जादू जगी या शेकडो सालात चालावी

तिला ना वावडे दु:खे, सुखे, भीती नि मोहाचे
मनाचा जो असावा हाल त्या हालात चालावी

असो खोडी तिला लाडीकशी की गुदगुली व्हावी
प्रियेची

श्रीमंत प्रेयसी


न कारंजी उडू देऊ मनाची यार बेण्याची
सफाई द्यायला आली असावी ती 'न येण्याची'

तुझी कंगाल छोटी झोपडी लखलाभ हो तुजला
तिची नाजूक स्वारी वाट पाही पुष्पमेण्याची

तुला ताटातुटीचा भार वाटावा न यासाठी
घरी स्थापून घे मूर्ती अजिंठ्यातील लेण्याची

इथे आवाज झाला बंद, वाटे का तिला चिंता?
म्हणे "आता जरूरी

...एकंदरीने !

.....................................
...एकंदरीने !
.....................................

झुंजले रात्रीसवे बेहत्तरीने...!
स्वप्न झाका फाटक्या या चादरीने !

चंद्र-तारे दे मला कविता कराया...
का मनाची भूक भागे भाकरीने ?

लावुनी धरलेस ते आयुष्यभर तू...
बोललो होतो कधी जे मस्करीने !

द्वेष कोणाचाच कोणी करत नाही...
सांगता येईल का हे खातरीने ?

`शेवटी लाथाच का माझ्या

सोसेना

            पापण्यांचे पापण्यांना सोसेना


            एवढेसे स्वप्न त्यांना सोसेना


                           हे फुलाचे पाप झाले झुरण्याचे


                           भास आता पाकळ्यांना सोसेना


             वास रक्ताचा कळेना कोणाच्या!


             त्रास माझ्या गारद्यांना सोसेना


                            पार व्हावे एकदाचे गाभारे


                            शांत जगणे एकट्यांना सोसेना


              वासनांना द्याच माफी पितरांनो!


               पिंड शिवणे कावळ्यांना सोसेना

कसेबसे

                     कसेबसे घाईत स्वतःचे काम उरकतो

                     जो तो येथे जमेल तितके दिवस ढकलतो

      पुढे जायला हवे,थांबणे शक्यही नसे

      पायामध्ये ताकद नाही तो सरपटतो

                      जिंकलो जरी वेदने तुझे राज्य अखेरी

                      जीव जाईना म्हणून मी मग का तळमळतो?

        रामनाम घेतलेस ना तू शेवटास?,तो

         क्षुल्लक तेव्हा जगण्याचे कोडे