गर्भामधील दीक्षा, ना तू मनावरी घे
हा चक्रव्यूह आहे, अभिमन्यु काळजी घे
येथे हळूच कोणी, जादा हुशार होते
आले तसे कुणी की, माघार आपली घे
मातेस काय त्याचे, चर्चा करी फुकाची
मामास काय त्याचे, हातात बासरी घे
रम्या कथा लढाई, कोणी नसे कुणाचा
होतील वार मित्रा, लवताच पापणी घे
सोपे
गझल
गझल
चक्रव्यूह
जगा बेभान यारो
कुणी या मांजरीला नेत माझी वेस सोडावे
पुन्हा येणार नाही त्यातिथे गझलेस सोडावे
दुधामध्ये मिळावी शर्करा हा योगही यावा
फुलेही सापडावी अन तिनेही केस सोडावे
जरी ती येत नाही रात ही जागून काढावी
रिकाम्या फाटक्या चंद्रासही पुर्वेस सोडावे
प्रतिज्ञाही करावीरे सकाळी मद्यमुक्तीची
न पाळावी उगा जादा तिला संध्येस सोडावे
जगा
भेटून जा...
-----------------------------
आसमानीच्या परी , भेटून जा
एकदा केव्हातरी भेटून जा...
मी समुद्रासारखा नाही जरी,
तू सरितेच्या परी भेटून जा
सावल्यांचे खूप झाले भास गे,
मन्मनाच्या अंतरी भेटून जा
मी तुला आव्हान आहे बांधले,
वादळा, माझ्या घरी भेटून जा..
दु:ख माझे माणकाच्या सारखे,
वेदनाही भर्जरी , भेटून जा
श्वास आता धाप टाकू लागले,
साजणे, आता तरी भेटून जा...
-----------------------------
माझा मलाच आता...
माझा मलाच आता अंदाज येत नाही
आतून कोणताही आवाज येत नाही
डोळ्यात सागराच्या उठती अनंत लाटा
पण मूक, मूक सारे .... ती गाज येत नाही
आहेत तसाच ठेवा चित्रातही मला ह्या
माझ्याच चेहर्याची मज लाज येत नाही
जो सूर पाहिला मी तेव्हा मिटून डोळे
माझ्या गळ्यातुनी तो स्वरसाज येत नाही
दिशा पहाटल्यात
चला पुन्हा मनास दु:ख पांघरायला चला
दिशा पहाटल्यात सत्य अंथरायला चला
न मागतो तरी मिळे, न वाचवी तरी उरे
उगाच लाभलाय वेळ वापरायला चला
न आज घेतली, न घेउनीच चाललोय मी
जरा मला धरायला नि सावरायला चला
'अधीकचिन्ह' दोन आकड्यामधील मी असे
वजा करा मला नी बेरजा करायला चला
यमास
तिथे नाक घासा
अरेरे कसासा
पडे आज फासा
इथे हात जोडा
तिथे नाक घासा
सदा श्वास आहे
न आहे तपासा
असो वेड माझे
तिच्याही सुवासा
खुषी ये चुकीने
तरी आ न वासा
पहा आरशा मी
कुणी आपलासा
कसा आज आला?
पुराणा उसासा?
असे मद्य तेव्हा
मला मी हवासा
सुनामी मनाचा
दिसो ना जरासा
करा नझ्म साली
उगी वेळ नासा
थांबवा हे जग
थांबवा हे जग, मला उतरायचे आहे*
जायचे नाही पुढे थांबायचे आहे
जा कुठेही आज स्वप्नांनो निवाऱ्याला
आज रात्री शांत मज झोपायचे आहे
एक हाताचीच बोटे ती पुरे झाली
सज्जनांना जर कुणा मोजायचे आहे!
रद्द झाल्या का अचानक शर्यती साऱ्या?
मी कधी म्हटले मला धावायचे आहे!
फार झाल्या विनवण्या आता महात्म्यांच्या
मार्ग
गुंते
वळतो मी,सोडवतो जुने गुंते
थकतो मी,रोज उभे नवे गुंते
जगण्याची हाव पुन्हा पुन्हा होई
सुटणारे फार तसे कुठे गुंते?
पुसण्याला आज मला छुपे आले
टळले माझे कळल्यामुळे गुंते
पडणारे स्वप्न तरी पुरे व्हावे
पण तेही आटपले,तिथे गुंते
वय झाले फार
मैत्री
कशी झाली ? कधी झाली ? तुझी माझी गडे मैत्री
मना कोडे सदा घाली, तुझी माझी गडे मैत्री
टपोरे चांदणे गेले, उटी लावून अंगाला
पहाटेला कशी न्हाली, तुझी माझी गडे मैत्री
कशासाठी लिहू मीही, चिठोरा चार शब्दांचा
खुणा गोंदी तुझ्या गाली, तुझी माझी गडे मैत्री
जरी भेटावया आलो, तुला मी
अफवा
माझ्या तुझ्या कथेच्या उडती अजून अफवा
जातो जिथे तिथे मी येती फिरून अफवा
नाही तुक्या तुझीही गाथा तरून गेली
गेली बुडून पाने, आल्या तरून अफवा
त्यांचेच शब्द त्यांना लखलाभ होत गेले
ओठामधून ज्यांच्या गेल्या निघून अफवा
मी ऐकवू कशाला माझी खरी कहाणी
सार्या दिशादिशांना होत्या भरून अफवा
इतकाच जीवनाचा निष्कर्ष