गझल

गझल

डोळे


बघता बघता विझले डोळे
हसता हसता भिजले डोळे

आठवणींचे वादळ आले
एकाएकी थिजले डोळे

दु:खाला मी तासत गेलो
माझ्या नकळत झिजले डोळे

ह्या अश्रुंचे आधण झाले
आयुष्याचे शिजले डोळे

स्वप्नांचा हा जागरगोंधळ
नाही माझे निजले डोळे


विवंचना



देव समजू लागलो जेव्हा मला मी, मजपुढे कित्येक मोठे पेच होते...
देह सोन्याचा जरी झालाच अर्धा , पाय हे अद्याप मातीचेच होते !!


काम भलत्याचेच, भलत्याच्या बढाया, किर्र अंधारात वाटा दाखवाया
श्रेय सगळे यद्यपि गेले दिव्याला, पेटण्याचे शौर्य वातीचेच होते !!


देह म्हणतो,"चोचले पुरते न झाले", मन म्हणे," आले, मला

...ते तसे नव्हतेच, पण...



ते तसे नव्हतेच ,पण मी ते तपासुन पाहिले,
मी तुझ्यामाझ्यातले नाते तपासुन पाहिले...

रात्र अर्धी लोटली की , सोडुनी मज एकला,
नेमके, मन कुठवरी जाते ?  तपासुन पाहिले...

त्या तिच्या नजरेत होते जीवनाचे गीत, ते
ती मुकी मुलगी कशी गाते ? तपासुन पाहिले...

जाणिले, जे भोगले , का भोगले

सोने

सोने

अघटित घडले त्या  बाजारी   जेव्हा पडले सोने
शेती फुलले  , जमिनीमध्ये  आहे  दडले सोने!

जरी भाजले तरी राहते कसे बरे  हे  तसेच सोने?
कळेल का मज  असे कोणत्या मुशीत घडले सोने?

निघून गेली कष्टामध्ये सगळी वर्षे आणिक-
आयुष्याच्या संध्याकाळी मग  सापडले सोने!

चकाकणारे सारे खरेच नसते येथे सोने
अंधार्‍या रात्री एकाकी  हळूच रडले सोने

स्पर्श  लाभता सार्थक 

प्रमोद खराडे यांची गझल...

वेदना जरी उरात या.. दिगंत
वाटतो परी जगास, भाग्यवंत

मी कुठे अशांत, एकटा, हताश
एक या उरात बोच, एक खंत

मिरवशील तू मला कुठे कशास
मी नसे तसा झकास शोभिवंत

ते जिथे, तिथे सुखात दैवजात
दुःख हे मला कसे असे अनंत

या मनात टळटळीत.. भरदुपार
या मनात.. एक तोतया वसंत

स्वप्न

भेटण्याची काय पण ही रीत आहे?
टाळुनी म्हणतेस वरती प्रीत आहे


गांजलेल्या माणसांच्या स्वागताला
झोपडी माझी उभ्या वस्तीत आहे


राहिल्या आता न चिंता कोणत्याही
मी दिवाळे काढुनी नि:श्चिंत आहे


आठवण गेली तुझी देऊन झोका
मी पुन्हा आता गडे मस्तीत आहे


ये भविष्याचे पुन्हा चल स्वप्न पाहू
कालचा इतिहास त्या रद्दीत आहे


           ----धोंडोपंत आपटे

...मी खरा की तू खरा ?

........................................
...मी खरा की तू खरा ?
........................................

भास मज माझा विचारी - मी खरा की तू खरा ?
ही पुरे झाली हुशारी - मी खरा की तू खरा ?

मध्यरात्री काल मी जे दुःख स्वप्नी सोसले...
आज ते म्हणते दुपारी - मी खरा की तू खरा ?

उत्तराची भीक

तमा

आम्ही कशाला बाळगू कोणाची तमा इथे!
आम्ही सर्वांना केले इतीहास जमा इथे!

अहो, मंदीरे बुडाली तेव्हा चर्चा होती,
कोण्या देवाला करिती गाव परिक्रमा इथे?

तयांचे घाव झेलाया वेदना जवळ केल्या,
पाहुनी हृदयी कोरडे लाजल्या जखमा इथे!

गुन्ह्यात शामील सारे आरोपी कुणास म्हणू,
कराया आतूर सगळे मजलाही क्षमा इथे!

ऊरात सुर्य

भेट

भेट

न पाहिले डोळे भरुनी तुला ना बोलले काही
तव भेटीची इच्छा मनास माझ्या जाळत राही

तुला भेटण्याला कितिक अंतर चालून आले  मी 
अशी गुंगले.. मैलांचा दगड मला दिसला नाही

चल निरोप घेऊ आपण दोघे या वळणावरती
भिन्न आपले मार्ग जरी बोलतील काहीबाही

सरली भरती अन् उरली मागे एकाकी रेती

... राहिलो मी

हातात पुष्पमाला सजवून राहिलो मी
हलकेच गाठ सुटता उधळून राहिलो मी

बस रोखण्यास गेलो, तिरप्या अनेक नजरा
निर्लेप आंत बसले, लटकून राहिलो मी

स्वच्छंद धुंद विहरू, सागर तटात गाऊ
प्रेमात भावनौका उलटून राहिलो मी

जगणे मधूर आहे, चाखू कसे कळेना
कडुनिंब पालवीला चघळून राहिलो मी

जीवन कसे जगावे? अर्थास मान