गझल

गझल

... किती लाचार व्हावे ?

....................................................
... किती लाचार व्हावे ?
....................................................

वाटते आता मला की, मी शहाणा फार व्हावे !
अन्यथा समजू नये काहीच, वेडा ठार व्हावे !!

घेतली माझ्या शिरी मी एवढी ओझी कुणाची ?
का असे आयुष्य हे माझे मलाही भार व्हावे  ? 

तुज स्मरावे ज्या क्षणी मी त्या क्षणी येशी पुढे

तेंव्हा..



वेदना माझ्या तिला कळतील  तेंव्हा
लाघवी डोळे मला बघतील    तेंव्हा...

स्वप्न फिरते सारखे डोळ्यात माझ्या 
हात हे हाती तिच्या असतील  तेंव्हा..?

आळ येइल पाखरावर कत्तलीचा
मज फुलांचे प्रेत ही दिसतील  तेंव्हा

वाटते जिंकून घ्यावे मी  जगाला
पण तिच्याशी हात हे लढतील  तेंव्हा ..?

ठेवुनी बघ ह्रुदय तू ह्रुदयात माझ्या
भावनेला

ठिपका

घडायचे ते घडले काही टळले नाही
त्या वळणावर तुला भेटणे चुकले नाही

कळले नाही कसा कधी संवाद संपला
वाद कधी मग सुरू जाहला कळले नाही

आज अचानक अर्थ असा हा समोर आला
त्या धक्यातुन शब्द कधी सावरले नाही

तू ओठांनी निर्धाराने  खूप लपवले
पण डोळ्यांना तुझ्या कधी ते जमले नाही

तशी जुनी शब्दांची माझी ओळख

...जन्माचे आवर्तन सात...

...गझल...


दाद मिळाली ज्या भावात ,
विकत घेतली हातोहात !


चुका सातशे करण्याला ,
जन्माचे आवर्तन सात !


छोटे वय मोठ्यास म्हणे,
"हात ! हारे ! हातरे ! हात !"


पणतीच्या व्यासंगाला
वातीच्या देहाचा घात !


भिंतीला जाणीव हवी
वार्‍याचा पुरतो आघात!


तुझे नियंत्रण मरणावर ,
जगणे तर माझ्या हातात ! 


...शॅलेश कुलकर्णी


 


 

धिटाई

कितींदा तुझी ही नभाशी लढाई,
मनाची मनाशी कशाला चढाई
 
खरे रूप झाकून शालीन माती,
भुकंपात का ती निघावी शिलाई?
 
मिळावी सुखे देणगीसारखी ती!
कुणी राखली संचिताची कमाई?
 
चुका टाळुनी वाट शोधेल आता,
कलीने अशी ह्यास द्यावी ढिलाई?
 
किती चाळशी, फाडशी कागदांना,
किती दाम तूझे? फुकाची बढाई!
 
जळावे अजूनी जरी राख आहे,
असे बोलते या शवाची धिटाई!

- निलेश सकपाळ

चित्र जुने

बान्धूया वाळूत घरे
आकाशी सुन्दर छपरे
वाळूवर का ढकलावे
लाटान्चे लाखो नखरे
दगड जरी जखमा करतो
वीट मऊ हे कुठे खरे
सोबत असून छळणारे
कसे बायकान्चे नवरे
सन्घटनेने ठरवूया
स्वतः बरे नी काम बरे
सोक्षमोक्ष होणार पुन्हा
मी चुकतो की तिचे खरे
सन्साराचे चित्र जुने
इथे डाग अन तिथे चरे

...शून्य माझी कलमकारी !!

.....................................
...शून्य माझी कलमकारी !!
.....................................

`मित्र ` एखादा मला भेटेल कोठे समविचारी ?
जो कधी करणार नाही काजव्याची मिनतवारी !

मी तुला आनंद देतो, तू मला थोडे हसू दे...
जीवनाचे नाव आहे हीच, असली उसनवारी !

ज्या सुखांसाठी जिवाची लावली मी काल बाजी...
आज येऊ लागली का त्या सुखांची

हातच दगडाखाली माझे...

...गझल...

हातच दगडाखाली माझे ऐकुन ते घेणारही नव्हते ,
माझी परखड मते मांडणे आता परवडणारही नव्हते...

समजू शकतो , त्या वेड्यांनी काल तमाशा का केलेला ?
पचले नाही , दीडशहाणे , कुचके बडबडणारही नव्हते ?

दुःखे , चिंता , ईर्षा , त्रागा अन बदनामी पदरी , त्याच्या
परिणामांची यादी केली ,  जे आता घडणारही

आवे

जीवनाचे रोज दावे
वाद्ळाचे पेहरावे


माणसाची हाव वाढे
वेदनेचे चोर कावे


अंत नाही वंचनेला
ओंजळीला खूप चावे


शोषणारे या भुकेला
भाकरीचे हेलकावे


कायद्याचे बोलतांना
फायद्याचे बारकावे


जीवनाला भाजणारे
पापण्यांचे बंद आवे   =   बापू दासरी

..मी कुठे काही म्हणालो ?

...गझल...

त्याच रीती , त्याच चाली , मी कुठे काही म्हणालो ?
तेच ओझे , ती हमाली , मी कुठे काही म्हणालो ?

वाढते वय धावते माझ्यापुढे , टाकीत धापा ,
सांगती ह्या हालचाली , मी कुठे काही म्हणालो ?

मजवरी होत्या परजल्या आज तलवारी, तरी तू 
ठेविल्या लपवून ढाली , मी कुठे काही