गझल

गझल

...का असे?

हा अबोला, हे दुरावे...का असे?
जवळ तू अन् मी झुरावे...का असे?


प्रीत माझी मोहरे गाली तुझ्या
मागशी तरिही पुरावे...का असे?


बीज स्नेहाचेच पडले, त्यातुनी
संशयाने अंकुरावे ...का असे?


ठेवला मी साज खाली आणि तू
ऐकण्याला आतुरावे...का असे?


रोख भरले श्वास मी रोज तरिही
व्याजही थोडे उरावे...का असे?


काय मी नसणार उद्याला?...उगा
काळजाने काहुरावे...का असे?


 


(जयन्ता५२)

जटायू


का पुन्हा खोटे हसावे वाटते?
चेहर्‍यामागे लपावे वाटते...

कोणते ओझे उरी मी वाहतो
मोकळे व्हावे, रडावे वाटते!

चार दाणे आज कोणी टाकले
पाखरांना किलबिलावे वाटते

नेहमी नाकापुढे तो चालतो
नेहमी त्याला वळावे वाटते!

प्रश्न माझा वाल्मिकीला एवढा -
का जटायूला लढावे वाटते?

काय त्याचा दोष? कसली ही सजा?
...काय त्यालाही जगावे वाटते?

तोच मी अन त्याच या

राख..!


अता रात्र नाही गंधाळलेली..
उरी चंद्रकोरी कवटाळलेली..


तरीही बहर निशिगंधास येतो
नजर मात्र त्याची ओशाळलेली..


सखे शब्द होते कविता सहेली
अता फक्त पाने चुरगाळलेली..


पुन्हा एकटा मी उरतो किनारी
पुन्हा लाट येते फ़ेसाळलेली..


जरा थांब मरणा सोबत तुझ्या घे
मला जिंदगीही कंटाळलेली..


किती जाळण्याची केलीत घाई
तरी राख मागे रेंगाळलेली..!


–--   अभिजीत दाते

गारवा..!



कुंद या हवेत दाटलाय गारवा..
मज तरी असा कुठे हवाय गारवा ?


हे जळावरी कशास दाटले धुके,
रूप न्याहळीत गुंतलाय गारवा..


लोकरीत अंग सर्व झाकुनी कसा,
आज तो विचारतो कुठाय गारवा..


पांघरून शाल मी सुखात राहिलो
मज कुठे अजून झोंबलाय गारवा ?


रात चंद्रपावलात थांबली तिथे.
सोबतीस आज थांबलाय गारवा

अज्ञातवास

कवितेमधून माझ्या येतो सुवास माझा !
एकेक शब्द आहे हा खास, खास माझा !

माझ्या कथे-व्यथेची जावी बनून गाथा...
इतकीच आस माझी, इतकाच ध्यास माझा !

डोळे मिटून सारे पाहून घेतले मी...!
बसल्यास्थळीच सारा झाला प्रवास माझा !!

- याला प्रसन्नतेने आवाज दे तुझा तू...
आहे किती किती हा मुखडा

...टाळतो

रोजचा छळवाद आता टाळतो
मी तुझी ती याद आता टाळतो

पाहिजे आहे मनाला शांतता
एवढाही वाद आता टाळतो

मूळ भाषेची खुमारी आगळी
वाचणे अनुवाद आता टाळतो

सोडले लिहिणे गझल केव्हाच मी
मानभावी दाद आता टाळतो

साद स्वप्नांनी कितीही घातली
मी तरी प्रतिसाद आता टाळतो

हा पहा मृत्यूसवे मी चाललो..
जीवनाची ब्याद आता टाळतो

      दीपावलीच्या सर्वांना शुभेच्छा..!

तुझ्यामुळे...



तुला पाहिले, भान हरपले, तुझ्यामुळे
मीपण माझे  क्षणात विरले, तुझ्यामुळे

तुझे हासणे, जणु कमळाचे हळूच खुलणे
पाहुनिया ते भ्रमरहि फसले, तुझ्यामुळे

तुझे बोलणे, खुदकन हसणे, हळू लाजणे
जग हे किति मज सुंदर दिसले, तुझ्यामुळे

दवबिंदूंचे अळवावरच्या मोती झाले
वेलीवरती फूल उमलले, तुझ्यामुळे

चंद्र उगवला पुनवेचा तो आकाशी, पण
आज चांदणे

ताजमहल

जे जे केले होते दावे....
खोटे ठरले सर्व पुरावे...

गोड गळ्यांनी टाळ कुटा अन;
बेसुर्‍यांनीच गीत म्हणावे.

दिवसा ढवळ्या सक्त पहारा;
रात्रीला मोकाट फिरावे.

बोल जराशी तू प्रेमाने;
सहज येतील जवळ दुरावे.

ताज महल मी आज बांधतो;
आधी तू मुमताज बनावे.

सांग नशिबा मला एवढे;
फुकट तुला मी का पोसावे

शब्द ठेचाळतो...

.........................
शब्द ठेचाळतो...
.........................

उंबऱ्याशी तुझ्या जीव घोटाळतो !
याचसाठी तुझी वाट मी टाळतो !

शब्द देऊन विसरून जातेस तू...
शब्द नाही दिला मी, तरी पाळतो !

दुःख नाहीच ते मानतो दुःख मी
कोरडी कोरडी आसवे ढाळतो !

लागते सावरावेच ना शेवटी ?
तोल जाता, मला मीच सांभाळतो !

तीच

"खेळी"

"खेळी"


गंध नाही फुलांस आता रे
संग नाही कुणास आता रे


पाह ना ओढतात हे 'टांगा',
सांग खेळी तुझीच आता रे


शोध हा कोणता?? तुझा आहे,
(देवलोकांत बात आता रे!)


ध्यान लावू?.. विटाळल्या जागा!,
कारणांचे 'कारण' आता रे


जाळले मी मलाच ज्वाळांशी,
दोष नाही दिव्यास आता रे


निलेश सकपाळ
१८ मार्च २००८