गझल

गझल

माझा स्वभाव नाही

माझा स्वभाव नाही

कुठल्याच मंदिराचा मजवर प्रभाव नाही
तरीही इथे सुखाचा काही अभाव नाही

सत्ता इथे मठांची आणिक आश्रमांची
घामास अन् श्रमांना कोठेच वाव नाही

नित्यारती हवी रे हर एक दैवताला
ज्याला नसे पुजारी त्याचा निभाव नाही

चरितार्थ चालविती जत्रा नि कुंभमेळे
नवसास पावल्याविण देवास भाव नाही

जो अंतरी सदाचा

जत्रा

एका जत्रेत थोडयाशा गोंधळाने असंख्य लोक चिरडून मेले.
त्यानंतरची ही रचना...

जत्रा

निर्जीव देवतांच्या करतात येथ जत्रा
जातात जीव तरीही भरतात येथ जत्रा

ओझे परंपरांचे ठरतेय जीवघेणे
वेठीस बापुड्यांना धरतात येथ जत्रा

तो देव का दयाळू होई असा कठोर?
प्रश्नांसमोर असल्या हरतात येथ जत्रा

झाले ठिकाण जत्रा, चिंता आणि भयाचे

कोलाहलात सार्‍या कोणी अबोल आहे

कोलाहलात सार्‍या कोणी अबोल आहे
जरि बोलतात डोळे कोणास मोल आहे?

काही नवे रुजावे काही नवे फुलावे
वैराण वाळवंटी हे स्वप्न फोल आहे

तुडवित रुक्ष वाटा आयुष्य व्यर्थ गेले
जरि नेत्र कोरडे हे हृदयात ओल आहे

सांभाळुनी निघालो, समजून एकमेका
हातात हात तरिही सुटतोच तोल आहे

येथे उदंड झाले, गद्यातले मनोरे
गझलेत शब्द थोडे पण अर्थ खोल आहे

जीवनाशी जुंपली

जीवनाशी जुम्पली  आता लढाई
संपला तह अन सुरू ही हातघाई

मज दिसेना काय आहे त्या तळाशी
वेदनेची केवढी ही खोल खाई!

जे न उठते पेटुनी वणव्याप्रमाणे,
ते न असते रक्त,ती तर लाल शाई

जे प्रजेला भाकरी देऊ न शकले,
मारती ते ई-गव्हर्नन्स्ची बढाई

मानली नाही अजुन मी हार माझी
मी

हात तुझा हातात

हात तुझा हातात एकदा.... क्षणभर दे मजला
नंतर जर वाटले तुला तर....अंतर दे मजला

नकोस बांधू कुंपण कारा सभोवती माझ्या
झुळझुळणारा वारा मी, तू...... अंबर दे मजला

सत्ता संपत्ती अन लौकिक काय करू देवा?
आनंदाने जगण्यापुरती भाकर दे मजला

मनोरथाचे अश्व दौडती अजूनही माझ्या
संपव माझे विश्व एकदा...ठोकर दे मजला

तुझ्या नि माझ्या भेटीचे युग...

तुझ्या नि माझ्या भेटीचे युग जरी संपले आहे
मनात माझ्या फिरुन जुने ते वादळ उठले आहे

तुझ्यासारखी मी ही केली कुजबुज एकांताशी
मधुर स्मृतींनी एकांताला पुन्हा रडवले आहे

नेहमीच मज तुझी सांत्वना जगण्याचे बळ देते
अन्यथा व्यथांनी मनास पुरते गुरफटले आहे

जरा न मन मोहरले माझे, फक्त शहारा आला
वसंत

सांगती खोटे जरी


सांगती खोटे जरी सारीच पाने,
ग्रंथ येथे थोर ठरतो वेष्टनाने


सांग, शब्दांनी कसे मी सर्व सांगू?
काळजाला ओळखावे काळजाने


पाखरू सोसेल ही बंदी,परंतू
गीत मुक्तीचे न गावे पिंजऱ्याने


सर्व ते गेले सुखाच्या मैफलीला
गायिली माझी व्यथा मी एकट्याने


"का तुझी -माझी अशी ही भेट झाली?"
-हे न काट्याला पुसावे पावलाने

             दिलीप पांढरपट्टे

 

 

 

काय फायदा?

आज पौर्णिमा नभात काय फायदा?
चांदणे नसे मनात काय फायदा?

वेचला मरंद तू जरी फुलांतुनी
वाटलास ना कुणात! काय फायदा?

पोटचे विकूनही न पोटभर मिळे
जन्म देउनी जगात काय फायदा?

चंद्र, चांदण्या खुडून आणशीलही
भाकरी न जर पुढयात काय फायदा?

दात आपलेच आणि ओठ आपले
गप्प बैस! बोलण्यात काय फायदा

ठेवला दडपून ज्यांनी...

ठेवला दडपून ज्यांनी नेमका इतिहास माझा
आज त्यांच्या संस्कृतीला होत आहे त्रास माझा

लाभले नाही  महाली सौख्य ज्यांच्या जीवनाला
वाटतो त्यांना सुखाचा मलमली वनवास माझा

लोक ते आता नव्याने लागले बहरावयाला
लाभला ग्रीष्मात ज्यांना श्रावणी सहवास माझा

देह माझा तडफडाया लागतो जेव्हा भुकेने
वाटते सार्‍या जगाला हा असे उपवास माझा

कमाई....

आयुष्याची तूच कमाई..
बाकी दुसरे काही नाही...

याच्यानंतर जेव्हा भेटू..
अपुल्याबद्दल बोलू काही..

तुला पाहिजे तसा वागतो...
म्हणून माझी किंमत नाही...

तोंडावरती गोड बोलतो..
पण माघारी सुरू लढाई..

जेव्हा आपण खोटे पडतो..
देतो त्यावर किती सफाई....

असे बोलतो आपण  दोघे..
जसे आपले काही नाही...

तूच बोलली मला स्वतःहुन..
मनात माझ्या नव्हते