गझल

गझल

...व्यवसाय मी

पापाकडे खेचलो गेलो काय मी?
आयुष्य ऊगा खुरटले बोन्साय मी ।

सैतान जागाच झाला माझ्यातला
हा मांडला भावनांचा व्यवसाय मी

लाथाडले नेहमी त्यांनी ते मला
त्या पायरीशी कसे नेले पाय मी?

नेतो मला तो कसाई कापायला
गोठ्यातली दावणीची ती गाय मी

वेड्यापरी तापतो आहे रोज मी
भट्टीतली लाजरी ओशट साय

असंभव

कशास त्याची वाट पहावी, जे घडणे आहेच असंभव
उत्तर बदलत नाही, तरिही, करते मन आशाळू आर्जव

या काठावर जसे पोचलो, त्यांच्यासाठी परके झालो
मुठीत अजुनी धरले आहे पैलतिराचे साखर-शैशव

पत्राचा मायना तसाही बदलावा लागणार तुजला
(फक्त बदललेल्या पत्त्यावर आता सारी पत्रे पाठव)

इथून वाटा वेगवेग़ळ्या - तुझे चांदणे सोबत नेतो

बत्तीस तारखेला

बत्तीस तारखेला

भलत्याच ऐनवेळी, हटकून तोल गेला
नादान सद्गुणांनी अवसानघात केला

जागून रात्र सारी, उपयोग काय झाला?
सावज रणात येता, कुत्रा पळून गेला

सांगू नकोस भलते सलतेच तू बहाणे
उरलाय शब्द केवळ, का ओल आटलेला?

नेमून लक्ष्य केले साधेपणास माझ्या
झालीय तीच राणी, माझा गुलाम केला

समजायला हवे ते, समजून

हुंदका ओठातला पोटात नाही

हुंदका ओठातला पोटात नाही
प्रेम व्यवहारातले, सत्यात नाही

मोजता खोली विचारांची कळाले
बोलतो नुसतेच, आचारात नाही

हिरकणीइतकीच फरपट रोज होते..
फक्त अमुचा लेख अभ्यासात नाही

धावतो आहेस परदेशी कशाला...?
गोष्ट कुठली आपुल्या देशात नाही

मी तुझ्यातिल माणसावर भाळलेली
हात धरलेला कुण्या ओघात नाही

याचसाठी माफ करते सर्व काही...
सोसल्याविन सौख्य

अस्तित्व दान केले

अस्तित्व दान केले

असणेच आज माझे, नसण्यासमान केले
माझ्याच सावलीने अस्तित्व दान केले

मस्तीत टाकलेल्या, एकाच पावलाने
पावित्र्य आज माझे, दोलायमान केले

हळवा नकोस होऊ, अश्रू मला म्हणाले
संतप्त हुंदक्यांनी, माझे निदान केले

चंचूप्रवेश ज्यांचा हळुवार पावलांनी
त्या शुभ्र कावळ्यांनी उद्ध्वस्त रान केले

वाचाळ वल्गनांना वैतागलो पुरेसा
कानास वेधणारे, रस्ते

काळ

असाही कधी संशयी काळ येतो
न केला गुन्हा मी तरी आळ येतो

दिली मी जरी उत्तरे योग्य सारी
पुन्हा परतुनी तोच वेताळ येतो

घसा कोरडा, पाय थकले तशातच
पुढे बोडका, तापला माळ येतो

चुली पेटवाया इथे आग नाही
कुठोनी घरे जाळण्या जाळ येतो?

कधी वाटते की जगावे जरासे
कसा नेमका

''सरावाने''

कोंडून आसवांना डोळ्यात सरावाने
चिक्कार सहन केले आघात सरावाने

जमलेच गणित नाही,जगण्याचे मरण्याचे
मरतोय रोज थोडा,जगण्यात सरावाने

आयुष्य कंठल्यावर्,झोपडपट्टीमध्ये
मी वावरेन म्हणतो,नरकात सरावाने

धागा मिळतो न सुई,दु:खीत काय घेवुन
काळीज फाटलेले,शिवतात सरावाने

लपवून वेदनेला,''कैलास'' घालतोहे
सदरा सुखी जनाचा,अंगात सरावाने.

--डॉ.कैलास गायकवाड.

मी कुठे शोधू अता ती ओळखीची माणसे

मी कुठे शोधू अता ती ओळखीची माणसे
वेगळे केले स्वतःचे विश्व ज्यांनी छानसे...

कोरडया होतात भेटी ओल नाही कालची
फक्त देखाव्यास उरले चेहर्‍यावरचे हसे...

रोज होतो घात माझा रोजचे आघात हे
सोकलेल्या वेदनेला हे नवे ना फारसे...

आर्त किंकाळी कळीची आजही मी ऐकली
वंशवेलीने किती घ्यावे बळी अजुनी असे?

दूर

हे फुलांचे उधान झाडांना...

हे फुलांचे उधान झाडांना
एक उरले न पान झाडांना

थांबतो सावलीमधे कोणी
वाटतो हाच मान झाडांना

गूण हा त्या महान झाडांचा
खुटवती ते लहान झाडांना

ऐकती दूरच्या ऋतूंना ते
तीक्ष्ण असतात कान झाडांना

ते न पुसतात जात कोणाची
धर्म सारे समान झाडांना

का अताशा कमी पडे छाया
पाहिजे का दुकान

फिरून यायचे इथे टळेल का कधी?

तुझे तुलाच सत्य हे, कळेल का कधी?
फिरून यायचे इथे, टळेल का कधी?

खुशाल फेक रोज घाण त्यामधे नवी
अखंड वाहता झरा मळेल का कधी?

नभाहुनी धराच ज्यास्त ओढ लावते
म्हणून पान कोवळे गळेल का कधी?

तुझ्या कथेमधे अमूल्य अर्थ आढळे
उगाच हा समाज कळवळेल का कधी?

कुकर्म आमचेच मात्र