गझल

गझल

म्हणालो त्यातले काहीच मी करणार नाही

बनावाला तुझ्या बिल्कूल मी बधणार नाही
डिवच तू पाहिजे तितके, कधी चिडणार नाही

नको लावून घेऊ घोर माझ्या बोलण्याचा
म्हणालो त्यातले काहीच मी करणार नाही

जरासे पाहिले माझ्याकडे आत्मीयतेने
मनाचा घाव का येथे कुणा दिसणार नाही?

मला वगळून जगणे एवढे सोपे नसावे
तशी मुद्दाम ती माझी खबर पुसणार नाही

तुला

पाऊल वळले...

कुणाशी बोलता आहात याची कल्पना आहे?

'शहाणा होउनी मरशील ही संभावना आहे'
कुणाशी बोलता आहात याची कल्पना आहे?

तुझ्याशी त्याच निष्ठेने पती वागायचा नाही
तुझे आजन्म पातिव्रत्य ही वारांगना आहे

पुरे आयुष्य काढावे तरी माहीत नाही की
जगाशी सामना नाही स्वतःशी सामना आहे

तुलाही शेवटी तिरक्या कटाक्षांची सवय जडली
मला वाटायचे माझीच सारी वल्गना आहे

इथे

''जमले''

काय झाले जर तुला मुखडे बदलणे जमले?
हो ! मला सुद्धा तुझ्या साच्यात बसणे जमले

पाहुनी धाग्यास जळताना प्रकाशासाठी
मेणही गेले शिकुन,.... त्याला वितळणे जमले

वावटळ वेडी जराशी काय ती भेटावी,
मस्तकापर्यंत मातिस आज उडणे जमले

बालपण्,ज्वानी,खुणा वृद्धापकाळा मधल्या
उमर ही नटली,तिला कपडे बदलणे जमले

मानतो आभार मी वाटेतल्या काट्यांचे

नव्या यमांची नवीन भाषा

नव्या यमांची नवीन भाषा

मला कळाली पुन्हा नव्याने, नव्या पिकांची नवीन भाषा
कठीण मातीत रूजणार्‍या, नव्या बियांची नवीन भाषा

पुन्हा नव्याने नवीन फुटली, अबोलतेला नवीन वाचा
नवीन दृष्टी, नवे इरादे, निरक्षरांची नवीन भाषा

नभात झेपावण्यास देती, ढगांस टक्कर, विजेस चटके
नवीन किलबिल, नवीन कुजबुज, नव्या पिलांची नवीन भाषा

नशीब आहे

मी जिथे नाही अशी जागाच नाही

मी जिथे नाही अशी जागाच नाही
प्रश्न 'मी आहे कुठे' इतकाच नाही

बाप या दुनियेत, आकाशात आई
मी गझल आहे जिचा मतलाच नाही

लोक अस्तित्वामुळे दु:खात सारे
जन्मला नाहीच त्याला जाच नाही

हा कुठे पोचेल ही चिंता जगाला
देउया आधार ही भाषाच नाही

लाख भोंदू गाडती नामोनिशाणी
रोज आठवणार मी

तू भेटली नव्हतीस तोवर

तू भेटली नव्हतीस तोवर चालले होते बरे
लक्षात नाही यायचे तेव्हा मनावरचे चरे

आपण जिथे भेटायचो ही त्या पुलाचीही व्यथा
चिक्कार पाणी वाहिले उरले तरीही भोवरे

ईमेल, एसेमेस येती रोज पाचोळ्यापरी
गेली कुठे गंधाळलेली ती जुनी पत्रोत्तरे?

झालो तिच्या प्रेमात जाळीदार पिंपळपान मी
अन् ती म्हणे ठेवू कशाला आठवांची लक्तरे

मनात माझ्या कुठून येते बरेच काही?

ठरून येते, चुकून येते, बरेच काही
मनात माझ्या कुठून येते बरेच काही?

भणंग संध्या, भकास राती, उजाड स्वप्ने
नसेल ती तर जमून येते बरेच काही

जमेल तितकीच ठेवतो मी विनम्र वाणी
बरेचदा मग मधून येते बरेच काही

गुलाम इतका बनून जातो सजावटीचा
चितेवरीही सजून येते बरेच काही

कुणाकुणाला छदाम नाही

रुढी परंपरेचा का बांधलास शेला?

रुढी परंपरेचा का बांधलास शेला?
या मानवी जगाच्या टाळून सभ्यतेला

येथील संस्क्रुतीला मी हा सवाल केला
वस्तीत माणसांच्या माणूस का भुकेला?

काबा नको न काशी बस हाक द्या स्वत:ला
अन जागवा जरासे अपुल्याच अस्मितेला

सूर्यास जाग यावी गावाकुसात अमुच्या
येथे युगायुगाचा अंधार दाटलेला

ज्यांना हवाच होता काळोख भोवताली
देतील दोष

............. अजून काही

हवे कशाला हसावयाला, नवे बहाणे अजून काही
तयार झाले जगावयाला नवे दिवाणे अजून काही...

हरेल शत्रू , नव्या दमाने चला लढाई लढावयाला
मिळून गाऊ पराक्रमाचे नवे तराणे अजून काही...

कुणी रहाते इथे उपाशी, कुणा मिळे भाकरी तुपाशी
नको उद्याची मनास चिंता, खिशात दाणे अजून काही...

अजून आहे मनात वेड्या नव्या